





एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
“भारतीय लोकशाहीत निवडणूका ह्या आत्मा असून लोकशाही टिकवण्यासाठी मतदारांचे वर्तन व राजकीय पक्षांचे भूमिका महत्वाची आहे.“– प्रा. डॉ. भागवत शंकर महाले, राज्यशास्त्र विभागप्रमुख, (म.वि.प्र.त्र्यंबकेश्वर महाविद्यालय)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि 8 डिसेंबर 2024
β⇔नाशिक,ता.14 (प्रतिनिधी : शाश्वत महाले ):- डॉ. भा.ल. भोले विचार मंच, नागपूर आणि यशवंत महाविद्यालय सेलू (राज्यशास्त्र व इतिहास विभाग), जिल्हा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने “भारतीय राजकीय व्यवस्था, निवडणूक प्रक्रिया आणि मतदार वर्तन” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र सेलू (वर्धा) येथे नुकतेच यशस्वीपणे संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. शेषकुमार येरलकर, सचिव डॉ. अशोक काळे, डॉ. प्रवीण बागडीकर (राज्यशास्त्र अभ्यास मंडळ अध्यक्ष), प्रा.डॉ.सचीचीत्रा मिश्रा , कार्यक्रमाचे बीजभाषण व प्रमुख वक्ते प्रा. डॉ. भागवत शंकर महाले, (राज्यशास्त्र विभागप्रमुख, (म. वि. प्र. समाज संस्था नाशिक, त्र्यंबकेश्वर महाविद्यालय) प्रा.सुरेश भोये, कथन शहा, आदीसह ९० हून अधिक प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे बीज भाषणात प्रा. डॉ. भागवत शंकर महाले म्हणाले की, “भारतीय लोकशाहीत निवडणूक प्रक्रिया हा आत्मा आहे आणि ती टिकवण्यासाठी राजकीय पक्षांचे ध्येयधोरण व मतदारांचे वर्तन महत्त्वाचे आहे.” त्यांनी मतदारांच्या वर्तनावर सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची आवश्यकता अधोरेखित केली. मतदारांनी फक्त आर्थिक आमिषे न पाहता चांगले उमेदवार निवडणे हे लोकशाहीसाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. महाले पुढे म्हणाले की, राजकीय पक्षांनी देशाच्या हितासाठी ध्येयधोरण ठरवून समाजाच्या विकासासाठी काम करणे गरजेचे आहे. निवडणूक आयोगाचा कार्यभार तसेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वास कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. लोकशाहीची ताकद व मतदार वर्तन हे असून मतदारांनी राजकीय प्रक्रियेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे आणि लोभापोटी चुकीच्या निवडी टाळल्या पाहिजेत. देशातील राजकीय प्रक्रियेत दिसून येणाऱ्या घराणीशाही, भांडवलशाही आणि गुंडशाही यांसारख्या आव्हानांचा मतदारांच्या योग्य निवडीनेच या अडचणींवर मात करता येईल. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. काही मतदारांनी ईव्हीएम मशीनच्या वापरावर आक्षेप घेतले असल्याचेही त्यांनी नमूद केले. निवडणुकीत पारदर्शकतेची आवश्यकता अधोरेखित करत, त्यांनी मतदार जागृतीवर भर दिला.

कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. प्रवीण बागडीकर, अध्यक्ष राज्यशास्त्र अभ्यास मंडळ, यावेळी बोलतांना म्हणाले, की चर्चासत्रामध्ये भारतीय लोकशाहीतील राजकीय व्यवस्था, निवडणूक प्रक्रियेतील सुधारणा, मतदारांच्या मानसिकतेतील बदल, तसेच मतदारांच्या भूमिकेतून होणाऱ्या देशाच्या विकासाची दिशा यावर मार्गदर्शन केले, त्यांनी घराणेशाही, साम्राज्यशाही, आर्थिक सत्ता यावर सविस्तर राजकीय वलय असल्याचे सांगितले. मतदार वर्तन संबधी जनतेचे शासनाच्या योजनाबाबत देखील कारणीभूत असल्याचे सांगितले.
β : नाशिक :⇔ “भारतीय लोकशाहीत निवडणूका ह्या आत्मा असून लोकशाही टिकवण्यासाठी मतदारांचे वर्तन व राजकीय पक्षांचे भूमिका महत्वाची आहे.“-कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शेषकुमार येरलकर(प्रतिनिधी : शाश्वत महाले)
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शेषकुमार येरलकर, अध्यक्षीय भाषण करतांना म्हणाले, “भारतीय लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया आणि मतदार वर्तन या दोन्ही घटकांची भूमिका महत्त्वाची आहे.” त्यांनी लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकता व निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर भर दिला.
यशवंत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य संदीप काळे यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि त्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी महाविद्यालयाचा शैक्षणिक आढावा घेत संस्थेची प्रगती विशद केली. या चर्चासत्राने विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक, आणि प्राध्यापकांना एकत्र आणत भारतीय लोकशाही व्यवस्थेच्या संवर्धनासाठी नवीन दिशा दिली. सदर चर्चासत्रात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे शोध निबंधाना पारितोषिक देवून गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.स्वाती देशमुख यांनी केले आभार प्रदर्शन प्रा. राठोड सर यांनी केले.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510