संदीप फाऊंडेशन फार्मसीच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी
मेडफ़ास्ट या व्यावसायिक संकल्पनेस ४ लाखाचे आर्थिक सहाय्य
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज : नाशिक: दि. 21 , ऑगस्ट 2023
β⇒ 21 ( प्रतिनिधी : डॉ. कमलेश दंडगव्हाळ ) :- येथील संदीप ट्रेनिंग अँड बिसनेस इन्क्युबेशन व मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेकनॉलॉजि डेव्हलपमेंट ऑफ इंडिया व मायटी हब यांच्या संयुक्त विद्यमाने इंटरप्रिंनर्स टाइड २.० ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेची प्रथम फेरी ४ ऑगस्ट तर व्दितीय फेरी १२ ऑगस्ट रोजी घेण्यात आली. देशभरातून ८४ प्रोपोजलचा समावेश होता. त्यात संदीप इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेसचे अंतिम वर्षातील विद्यार्थी सोहंम म्हात्रे, शुभम वाळुंज व सोमेन मैती यांच्या मेडफ़ास्ट या व्यावसायिक संकल्पनेस ४ लाखाचे आर्थिक सहाय्य मिळाले आहे.
मेडफ़ास्ट हि एक व्यवसाय संकल्पना आहे, ज्या मध्ये कमीत कमी खर्चात रुग्ण उपचार घेऊ शकतो. यशस्वी विद्यार्थांना महाविद्यालयाच्या इनोवेशन इन्क्युबेशन विभाग प्रमुख प्रा डॉ सारिका कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. संदीप फाउंडेशनचे चेअरमन डॉ. संदीप झा, अकॅडेमिक फॅसिलिटेटर प्रमोद करोले प्राचार्य डॉ लक्ष्मीकांत बोरसे, प्राध्यापक व कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.
β⇒दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक :डॉ.भागवत महाले, मो . ८२०८१८०५१०
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
5 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
1 week ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
1 week ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)