





मखमलाबाद महाविद्यालयात ‘संविधान दिवस’ उत्साहात साजरा

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि 26 नोव्हेंबर 2024
β⇔ मखमलाबाद, (नाशिक), ता.26 (प्रतिनिधी: भगवान शिंदे ):- मविप्र समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मखमलाबाद या महाविद्यालयात ३० नोव्हेंबर हा ‘संविधान दिवस’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस .एस. राजोळे होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजोळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात बोलतांना म्हणाले की, भारताच्या संविधानात असणाऱ्या मूल्यांची माहिती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देत म्हणाले की समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय सर्वधर्मसमभाव एकात्मता या मूल्यांची जपवणूक करावी आणि त्याचा अंगीकार करावा असे सांगितले. पुढे बोलतांना म्हणाले की, संविधानाच्या तत्त्वावर भारत देश चालतो आपण सर्वांनी संविधानाचे काटेकोर पालन केले पाहिजेत असे सांगितले.
महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक भगवान शिंदे यांनी आपल्या मनोगतात संविधान निर्मिती प्रक्रिया भारताच्या संविधानावर असलेल्या विविध देशातील संविधानाचा प्रभाव कसा झाला व आपल्या संविधानात महापुरुषांच्या तत्त्वांचाही समावेश असून शाहू, फुले, आंबेडकर, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदर्श संविधानात आहेत असे सांगीतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आय. क्यू .एस. सी. प्रमुख प्रा. राजेंद्र खुर्ची यांनी केले .
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सह प्रा. डॉ.विलास पवार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा.अमोल ठाकरे, प्रा. एस आर दौंड, प्रा. वैष्णवी महाले, प्रा.के एल शिंदे, प्रा. कल्पना चोपडे प्रा सपना तांदळे, प्रा. अर्चना धारराव प्रा. वर्षा वाघ प्रा. भाग्यश्री कोरडे प्रा.अमोल पिंगळे , जितेंद्र हिरे, गणेश खराटे , शिवाजी बदादे , सुभाष पिंगळे आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी एन वाघ यांनी केले आभार प्रदर्शन डॉ.ज्ञानेश्वर भगुरे यांनी केले.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510