





बिटको महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन …

β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि. 6 डिसेंबर 2023
β⇔नाशिकरोड,ता. 6 ( प्रतिनिधी : संजय परमसागर) :- गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात बुधवार दि. ६ डिसेंबर रोजी महामानव व ज्ञानाच्या अथांग महासागरास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले . महाविद्यालयातील ग्रंथालयात झालेल्या कार्यक्रमात प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी पुष्पहार घालून मेणबत्त्या प्रज्वलित करुन सामुदायिक बुद्धवंदना म्हणण्यात आली.याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी सांगितले की,” भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व व दृष्टी दिली.वाचनाने समाज अधिक प्रगल्भ व समृद्ध होतो . शिका ,संघटित व्हा व संघर्ष करा या मूलमंत्राचे महत्व स्पष्ट केले . स्त्रीशिक्षणासाठी ते अधिक आग्रही होते , त्यांची आवडती जागा ग्रंथालय होती असे सांगितले .
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, डॉ. आकाश ठाकूर,विज्ञान विभागाचे समन्व्यक डॉ. के. सी. टकले , कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे, ग्रंथपाल एस.व्ही चंद्रात्रे, डॉ. अश्विनी घनबहादूर, एनसीसी प्रमुख विजय सुकटे , प्रा. डॉ. कृष्णा शहाणे, रासेयो कार्यक्रम महिला अधिकारी डॉ. कांचन सनानसे , डॉ. विलास कांबळे , संजय परमसागर , अशोक अहिरे , अनिल गोरे , मेघा गोत, शीतल घुगे,राज राजू कनोजिया, दिनेश शार्दूल, रोहित पाईकराव, सरोज कांबळे , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.गणेश कसबे याने भीमगीत सादर केले . या कार्यक्रमासाठी ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले .
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो.८२०८१८०५१०
