





७व्या वेतन आयोग पडताळणीतील दिरंगाईबाबत जबाबदारी निश्चित करून कारवाईची मागणी – संजय पगार

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि 18 ऑक्टोबर 2024
β⇔दिंडोरी(नाशिक) : ता.18 ( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव):- दिंडोरी पंचायत समितीमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य सरचिटणीस/कार्यवाह संजय बबनराव पगार यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी भास्कर रेंडगे यांची भेट घेतली.यावेळी दिंडोरी तालुक्यातील शिक्षकांची सेवापुस्तक पडताळणी, फरक बिलांचा त्वरित निपटारा करण्याची मागणी करण्यात आली.
या बैठकीत गटविकास अधिकारी रेंडगे, अधीक्षक नितीन दळवी, सहाय्यक लेखा अधिकारी बहिरम यांच्या उपस्थितीत शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, निवड श्रेणी, चटोपाध्याय फरक बिले आणि एकस्तर बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षक परिषदेने लेखी निवेदन सादर करून सातवा वेतन आयोगाची पडताळणी व फरक बिले शिक्षकांच्या खात्यावर जमा होण्यासाठी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आणि कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
शिक्षक परिषदेच्या प्रतिनिधींनी असे नमूद केले की, जे शिक्षक प्रामाणिकपणे आपल्या शाळांवर कार्यरत असतात, त्यांची कामे प्रलंबित राहतात, तर वारंवार पंचायत समितीकडे धावणाऱ्या शिक्षकांची कामे लगेच होतात. यामुळे सेवाजेष्ठतेनुसार सेवा पुस्तके पडताळणी करून १००% प्रकरणांचा निपटारा करावा अशी मागणी केली.या बैठकीस विभागीय अध्यक्ष वासुदेव बोरसे, जिल्हाध्यक्ष रमेश गोहिल, जिल्हा सरचिटणीस/कार्यवाह रावसाहेब जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष मनोज सोनवणे, जिल्हा संघटन मंत्री योगेश जाधव, जिल्हा सल्लागार अरुण इंगळे, तालुकाध्यक्ष सुभाष बर्डे, सरचिटणीस श्रावण भोये, कार्याध्यक्ष अशोक पवार, कोषाध्यक्ष दादाजी आहिरे, कार्यकारी अध्यक्ष नितीन शिंदे, प्रसिद्धी प्रमुख शाहूल वानखेडे, महिला आघाडी अध्यक्षा दिपाली थोरात, मुख्याध्यापक प्रतिनिधी एकनाथ पाटील, सुरेश भोये, गणेश धवन आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा व राज्य पदाधिकारी सर्व तालुका पंचायत समिती कार्यालयात स्थानिक तालुका कार्यकारिणी सोबत भेट देऊन गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा करून शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हिताच्या निर्णयांची मागणी पुढे नेणार आहेत.
— श्री. संजय बबनराव पगार, राज्य सरचिटणीस/कार्यवाह
(महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, प्राथमिक विभाग)
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )