β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :नाशिक : रविवार : दि.16 फेब्रुवारी 2025
β⇔नाशिकरोड(नाशिक)दि.16 (प्रतिनिधी: संजय परमसागर ):- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ, पुणे आणि बहि:शाल शिक्षण केंद्र नाशिकरोड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ” ज्ञान विज्ञान,वाचन चळवळ व्याख्यानमाला” दि. १३ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी अशी ३ दिवस आयोजित करण्यात आली. नाशिकरोड बिटको महाविद्यालयात बहि:शाल शिक्षण केंद्राचे हे द्वितीय वर्ष असून व्याख्यानमालेचे डॉ. राजेश झनकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यांनी ” आधे अधुरे ‘ ‘ या मोहन राकेश यांच्या नाटकावरील व्याख्यानाने आपले पहिले पुष्प गुंफले. १९६० च्या दशकात भारतीय समाजात विशेषत: शहरी भारतातील कुटुंबव्यवस्थेत जोरदार घुसळण सुरू होती.पती पत्नीच्या संबंधावर विलक्षण ताण पडायला लागला होता. नोकरी करणाऱ्या स्त्रिया, तेथील उच्चपदस्थ पुरुष अधिकारी यामुळे कुटुंबात वेगळ्या समस्या निर्माण होत होत्या, अशा कुटुंबाचे स्वप्न, त्या स्वप्नांना छेद देणारं वास्तव, बेकारी अशा दाहक सामाजिक परिस्थितीत उच्चवर्णीय मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीचे परस्पर संबंध यांचा या नाटकात स्फोटक वेध घेतला आहे एकमेकांशी संवाद तुटलेल्या कुटुंबाचे मनोवेधक विश्लेषण डॉ. झनकर यांनी स्पष्ट केले. व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प डॉ. सायली आचार्य यांनी गुंफले. ‘बाईमाणूस’ या करूणा गोखले यांच्या पुस्तकाच्या मनोवेध त्यांनी उलगडून दाखवला. स्त्री मुक्ती या संकल्पनेला मध्यवर्ती ठेवून त्यांनी याची मांडणी केली. स्त्री देह, कुटुंब संस्था, स्त्री शिक्षण, प्रसार माध्यमे आणि स्त्री मुक्तिवाद विषयी विवेचन त्यांनी केले. तिसरे समारोपाचे व्याख्यान श्री. केशव माणिकराव मोरे यांनी १९५५ साली प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ‘ग्रामगीता’ या ग्रंथावर दिले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ‘ग्रामगीता’ म्हणजे त्यांच्या मनात घर करून राहिलेल्या गावाचे आणि ग्राम संस्कृतीचे नितळ रूप होय. खेड्यापाड्यांच्या रूपात उभ्या असलेल्या गाव संस्कृतीचे उत्कट दर्शन त्यांनी घेतले आणि ते ग्रामगीतेतून समर्थपणे मांडले. त्यांनी ग्राम शुद्धी, ग्राम निर्माण ,ग्राम रक्षण, ग्राम आरोग्य,ग्राम शिक्षण, ग्राम प्रार्थना, ग्रामसेवा, ग्राम आचार या साऱ्यांचा सूक्ष्म विचार या ग्रंथात केलेला आहे. श्री. मोरे यांनी या ग्रंथाचे मनोवेधक विश्लेषण केले. व्याख्यानमालेचे अध्यक्षपद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी भूषविले. व्याख्यानमालेस कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर तसेच विज्ञान शाखेचे समन्वयक डॉ. के. सी. टकले उपस्थित होते. मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. के. एम. लोखंडे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले . महाविद्यालयातील विविध विभागांचे प्राध्यापक व्याख्यानमालेस उपस्थित होते. तसेच बहुसंख्येने विद्यार्थ्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घेतला. व्याख्यानमालेचे प्रास्ताविक मराठी विभागाचे प्रा. आर. बी. बागुल यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. गीतांजली चिने, प्रा.अमर ठोंबरे तसेच प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. डॉ. आरती गायकवाड आणि प्रा. वृषाली उगले यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. शरद नागरे, प्रा. मीना गिरडकर, प्रा. राजाराम तराळ यांनी मानले.या व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी साठी डॉ. संतोष पगार,डॉ. मनेश पवार, प्रा. संतोष पगार, प्रा. रोहित पाटील, प्रा.सुजाता टोचे, कार्यालयीन अधिक्षक मुकुंद सोनवणे , रजिस्ट्रार राजेश लोखंडे, आकाश लव्हाळे, यांचे सहकार्य लाभले.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
🅱️: येडशी(धाराशिव):⇔येडशी जनता विद्यालय बारावी निकालाची उज्वल परंपरा कायम-(प्रतिनिधी-सुभान शेख)
2 weeks ago
🅱️ : पुणे :⇔ प्रा. डॉ. सोमनाथ वाघमारे यांना ‘झुलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे सीनियर सायंटिस्ट गोल्ड मेडल पुरस्कार प्रदान-(प्रतिनिधी-डॉ. भागवत महाले)
3 weeks ago
🅱️: नाशिकरोड:⇔बिटको महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्सहात संपन्न-(प्रतिनिधी-संजय परमसागर)
3 weeks ago
🅱️:येडशी(धाराशिव):⇔धाराशिव गटविकास अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघनप्रश्नी; श्रीमती.डांगे.पी.एम ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी-(प्रतिनिधी-सुभान शेख)
4 weeks ago
🅱️ : सुरगाणा(नाशिक):⇔”सामुदायिक विवाह हि काळाची गरज”-नरहरी झिरवाळ होय मी आदिवासी विकास मंत्री नव्हे, मात्र आदिवासी आहे, हे निश्चित-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
4 weeks ago
🅱️:सायखेडा(नाशिक):⇔”शिक्षकांनी ज्ञानदानाबरोबर विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य करावे-सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे”-प्रतिनिधी-राजेंद्र कदम)
4 weeks ago
🅱️⇔नाशिक(शहर):⇔”गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित पद्मविभूषण श्री.रतन टाटा स्मृती व्याख्यान संपन्न”-(प्रतिनिधी-छाया लोखंडे)