





डॉ. विलास आवारी यांचा सेवापूर्ती समारंभ आणि गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न
दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज : खास प्रतिनिधी अहमदनगर
अहमदनगर, ता.१८ (दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज ) :- येथील राजपॅलेस हॉटेलच्या सभागृहात डॉ. विलास आवारी यांचा सेवापूर्ती समारंभ आणि गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रमोद पवार, पुणे विद्यापीठ राज्यशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य प्राचार्य डॉ.राजधर टेमकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉ पी डी. देवरे सर, प्राचार्य डॉ मनोहर पाटील, प्राचार्य डॉ. सुनील कवडे , श्री जगताप गुरुजी, प्रा डॉ. कैलास सोनवणे, प्रा. डॉ. विलास नाबदे सर, प्रा डॉ संजय वाघ, प्रा डॉ. रिकामे सर, प्रा. डॉ. सदाफले सर, प्रा डॉ एकनाथ खांदवे, प्रा. डॉ. वीरेंद्ध धनशेटी सर , प्रा.डॉ सुरेश देवरे, प्रा डॉ संजय मराठे, प्रा. डॉ भागवत महाले, प्रा. डॉ दत्तात्रेय गोडगे, प्रा. डॉ. अशोक वसावे, प्रा. सुरेश भोये, प्रा. डॉ. रविराज वटणे , प्रा. डॉ .गणेश रोडे उपस्थित होते. यावेळी प्रो. डॉ. विलास आवारी सर व त्यांच्यसमवेत सौभाग्यवती अल्का आवारी मॅडम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.डॉ. विलास नाबदे संपादीत भारतीय लोकशाहीचे ७५ वर्षे : समीक्षा या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ विचारवंत पी.डी.देवरे यांच्यांया हस्नीते करण्यात आले . अध्यक्षीय भाषणामध्ये जेष्ठ विचारवंत पी.डी. देवरे यांनी राष्ट्राचा विकास करण्यात शिक्षकाची भूमिका महत्वपूर्ण ठरत आहे. संविधानिक मूल्य महाविद्यालयीन विध्यार्थ्यामध्ये चांगली रुजली तर लोकशाहीचा प्रवास विकास होवू शकतो अन्यथा पक्षीय हुकूमशाही राष्ट्रांमध्ये उदयास येते. डॉ.आवारी यांच्या सेवापुर्ती निमित्त प्रकाशन केलेले पुस्तक लोकशाहीतील आव्हाने दूर करण्यास उपयुक्त असेल व नवीन मतदार वर्गाला लोकशाही प्रक्रिया समजण्यास दिशादर्शक ठरेल भारतीय लोकशाहीचे ७५ वर्षानिमित्त ७५ लेख नवोदित लेखकांनी लिहिले आहे . हे भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने कौतुकास्पद आहे. नव लेखकांनी लेखणी हातात घेतली पाहिजे. डॉ.आवारी यांचे ३० वर्षातील शैक्षणिक कार्य समाज व राष्ट्र विकासासाठी कायमस्वरूपी दिशादर्शक असेल. विद्यार्थ्यांना दिशा देत बहुअंगी विकास घडवून आणणे यातच शिक्षकाची कसोटी असते. डॉ. आवारी कसोटी पूर्ण केली. त्यामुळे महाराष्ट्रभर सरांचे विद्यार्थी विविध क्षेत्रात नाव लौकिक मिळवीत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील निर्माण झालेल्या त्रुटी दूर करणे गरजेचे आहे . तरच भविष्यात भारतातील शिक्षण व्यवस्था विकसित होवून लोकशाही मजबूत होण्यास मदत होणार आहे, अन्यथा लोकशाहीचा रसातळाला जाईल अशी भीती वाटते , असे मत त्यांनी मांडले. यावेळी प्रा.संग्राम गुंजाळ , प्रा डॉ एकनाथ खांदवे, प्रा.डॉ. हेमलता राठोड, प्रा.डॉ. कैलास सोनावणे, लंके गुरुजी, प्रा.डॉ. विलास सदाफळ,प्रा डॉ संजय मराठे, प्रा. डॉ भागवत महाले, प्रा. डॉ दत्तात्रेय गोडगे, आदींनी मनोगत व्यक्त केले. डॉ.आवारी सरांचे मित्र, सहकारी, नातेवाईक , कुटुंबीय यांच्या बहुसंख्येने उपस्थितीत होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. विलास नाबदे यांनी केले . सूत्रसंचालन संगीता रिकामे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.डॉ. राजकुमार रिकामे यांनी केले .
दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले, मोब.८२०८१८०५१०