





गोखले फार्मसी महाविद्यालयात ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ उत्साहात साजरा…!’
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा :: शनिवार, 12 ऑगस्ट 2023
β⇒ नाशिक ,12 ( प्रतिनिधी : दिपाली भंडारी ):- ग्रंथालयांच्या विकासात डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांचा फार मोठा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ. रंगनाथन यांनीच रूजवला. नंतर तो जोपासण्यासाठीही आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त (12 ऑगस्ट) राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात येतो.
यानिमित्ताने वाचनसंस्कृती टिकावी आणि दिवसेंदिवस ती वृध्दींगत व्हावी यासाठी कॉलेज रोड ,नाशिक येथील गोखले एजुकेशन सोसायटी संचलित सर डॉ.मो. स.गोसावी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील अमृतकार , उप-प्राचार्य डॉ.प्रशांत पिंगळे , ग्रंथालय विभाग प्रमुख सौ. अनुपमा परांजपे ,विद्यार्थी कल्याण मंडळ प्रमुख श्री.साहेबराव बोरस्ते, पदविका विभाग प्रमुख सौ. रश्मी मिसाळ , ग्रंथालय शिक्षक समन्वयक सौ.दीपाली भंडारी ,प्रा. डॉ. रमणलाल कच्छवे, डॉ.दत्तात्रय शिनकर, प्रा.श्री. संदीप पुरकर विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालय विभाग प्रमुख सौ. अनुपमा परांजपे यांनी केले, त्यामध्ये त्यांनी राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाचे महत्व व भारतीय ग्रंथालय शास्रात डॉ.एस.आर.रंगनाथन यांचे योगदान थोडक्यात सांगितले. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन ग्रंथपाल विभाग प्रमुख सौ. अनुपमा परांजपे व सहाय्यक ग्रंथपाल श्री. उमेश पगारे यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनास सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :: मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले ,
