





ठक्कर इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी विद्यार्थ्यांची शैक्षणिक,औद्योगिक, मेडिसिनल गार्डन आणि मलजल प्रक्रिया केंद्रास भेट

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 28 फेब्रुवारी 2024
β⇔नाशिक (पंचवटी),दि.28(प्रतिनिधी: डॉ.भागवत महाले):-“श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती नर्मदाबेन पोपटलाल ठक्कर इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी येथील डी. फार्मसी च्या विद्यार्थ्यांची नुकतीच सातपूर येथील व्हाईटल फार्मास्युटिकल प्रा. ली. या कंपनीला भेट दिली. यावेळी औषधनिर्माणशास्राची माहिती करून घेतली, यात औषध निर्माण प्रक्रिया, त्यात वापरले जाणारे विविध ड्रुग्स व पॅकिंग संदर्भातील माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.
तपोवन येथील मेडिसिनल गार्डनला भेट देऊन विद्यार्थ्यांना विविध औषधी वनस्पती त्यांच्या जाती- प्रजाती, दुर्मिळ वनस्पती बघायला आणि शिकायला भेटल्या. त्यानंतर नासिक येथील महानगरपालिकेअंतर्गत येणारे मलजल शुद्धीकरणाची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. सदर शैक्षणिक भेटीस संस्थेचे अध्यक्ष नरेंद्रभाई ठक्कर, उपाध्यक्ष प्रकाशभाई पटेल, सचिव देवेंद्रभाई पटेल, फार्मसी विभागाचे सचिव उपेंद्रभाई दिनानी, सहसचिव अभयभाई चोक्सी व इतर संस्था व्यवस्थापक आणि प्राचार्य डॉ. विशाल गुलेचा यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. सुनीता महाले, प्रा. चेतना कापडणे यांच्याकडून शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते.