





“आदिवासी बांधवांनो घाबरु नका; सरकार भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभे आहे”: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
जोपर्यंत चंद्र, सूर्य,आहेत; तोपर्यंत मायेचा लाल संविधान बदलू शकत नाही: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 2 ऑगस्ट 2024
β⇔सुरगाणा(नाशिक), दि. 2(प्रतिनिधी : रतन चौधरी ):- “आदिवासी बांधवांनो, घाबरु नका, सरकार भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभे आहे. जो पर्यंत चंद्र, सूर्य आहेत, तो पर्यंत मायेचा लाल संविधान बदलू शकत नाही,” असे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुरगाणा येथे आयोजित ९१९ कोटी ४० लाख रुपयांच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात प्रसंगी केले.
या सोहळ्यात पवारांनी सुरगाणा तालुक्यातील विकास कामांवर प्रकाश टाकत विविध योजनांची माहिती दिली. त्यांनी शेतकऱ्यांसाठी वीज माफी, दहावी आणि बारावीच्या तरुणांसाठी स्टायपेंड, तीन मोफत गॅस सिलेंडर, मुलींच्या शिक्षणासाठी मोफत सुविधा, भात पिकासाठी हेक्टरी २०,००० रुपये अनुदान यांसारख्या योजना जाहीर केल्या. तसेच, लाडकी बहिण योजना, आशा आणि अंगणवाडी कर्मचारी मानधन वाढ यांसारख्या योजनांचा आढावा घेतला. यावेळी आदिवासी बांधवांच्या सांस्कृतिक नृत्याचे कौतुक करून, पवार यांनी या नृत्यविष्काराला संस्कृतीचा अमूल्य ठेवा म्हणून ओळख दिली. कार्यक्रमाच्या शेवटी, त्यांनी सुरगाणा तालुक्यातील विविध विकास प्रकल्पांवर जोर देत पुढील योजना आणि निधी मंजुरीचे आश्वासन दिले.
“मी सत्तेसाठी हपापलेला नाही, राज्यातील जनतेच्या विकासासाठी झगडणारा आहे,”: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
सुरगाणा तालुक्यात विविध विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या भाषणात, “मी सत्तेसाठी हपापलेला नाही, राज्यातील जनतेच्या विकासासाठी झगडणारा आहे,” असे ठामपणे सांगितले. त्यांनी कळवण सुरगाणा मतदारसंघात २२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे जाहीर केले. “लाडकी बहिण योजना” व इतर योजनांचा आढावा घेत त्यांनी सांगितले की, कोणत्याही जाती-धर्माची अट न ठेवता गरजू महिलांसाठी ही योजना आहे, आणि यासाठी ४६,००० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
आमदार नितीन पवार यांनी तालुक्याचा विकास का खुंटला यावर विचार मांडत, विकासाच्या माध्यमातून तालुक्याचा कलंक पुसण्याची आवश्यकता आहे, असे मत व्यक्त केले. त्यांनी सुरगाणा तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला आणि भविष्यात आणखी योजनांची अंमलबजावणी होणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला हजारो कार्यकर्ते, विशेषतः महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुरगाणा तालुक्याच्या आदिवासी संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संस्कृतीच्या संवर्धनासाठी शंभर कोटी रुपये मंजूर करण्याचे आश्वासन दिले. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कळवण सुरगाणा विधानसभेचे आमदार नितीन पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्रीताई पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, आमदार दिलीप काका बनकर, सरोजताई अहिरे, राजेंद्र उफाडे, सोनालीराजे पवार, जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार, हेमंत पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, ऋषी पवार, जिल्हा उपाध्यक्ष नवसू गायकवाड, गोपाळ धुम, सरपंच अनिता पवार, तुळशीराम महाले, योगेश ठाकरे, आनंदा झिरवाळ, अशोक गवळी, राजु पाटील, सखाराम सहारे, दीपक मेघा, माधव पवार, रामदास केंगा, काळू बागुल, हरिभाऊ भोये, भास्कर अलबाड, जयश्री शेजोळे, दिनेश चौधरी, जेष्ठ नेते भिका राऊत, विजू दळवी, युवराज लोखंडे, पुंडलिक खंबायत, राजु गवळी, जिजा कोल्हे, राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष जिजा कोल्हे, रोकडपाडा सरपंच अनिता पवार जिजा पवार, तहसीलदार रामजी राठोड, गटविकास अधिकारी महेश पोतदार, तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे यांच्यासह अनेक अधिकारी व्यासपीठावर आदी उपस्थित होते.

तीन मोफत गॅस सिलिंडर, मुलींसाठी मोफत शिक्षण, भात पिकाला हेक्टरी २०,००० रुपये अनुदान देणार : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेआश्वासन
आपल्या भाषणात अजितदादा पवार यांनी सांगितले की, “मी सामान्य वाडी वस्तीतून आलेला एक गोरगरीबांचा कार्यकर्ता आहे. माझ्या शब्दाचा मी पक्का आहे. एकदा शब्द दिला की, तो पाळण्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार असतो. विरोधकांनी ‘लाडकी बहिण योजना’ निवडणुकीनंतर बंद होईल, असा अपप्रचार केला आहे, पण हे कदापि होणार नाही.” अजित पवार यांनी सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेत शेतकऱ्यांसाठी वीज माफी, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टायपेंड, तीन मोफत गॅस सिलिंडर, आठ लाखाहून कमी उत्पन्न धारक मुलींसाठी मोफत शिक्षण, भात पिकाला हेक्टरी २०,००० रुपये अनुदान यासारख्या योजना राबविण्याचे आश्वासन दिले. “लाडकी बहिण योजना” मोलमजुरी करणाऱ्या महिलांसाठी असून, या योजनेसाठी ४६,००० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असेही त्यांनी नमूद केले. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी “आतिदुर्गम तालुक्यात दर्जेदार पोषण आहार पुरवला जातो आणि तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जातील,” असे सांगितले. तसेच, तालुक्यात स्मार्ट अंगणवाडी आणि पर्यटनस्थळे निर्माण करून बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन दिले.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वनजमिनीच्या प्रश्नावर समाधान होण्यासाठी वनविभागाच्या जाचक अटी शिथिल करण्याची मागणी करुन पेसा भागातील भरती करावी, या मागण्या सादर केल्या. आमदार नितीन पवार यांनी सुरगाणा तालुका “आकांक्षित तालुका” म्हणून निवडला गेला हे तालुक्याच्या विकासाची मोठी गरज दर्शवते, असे नमूद केले. त्यांनी तालुक्यातील विकासाची पोकळी भरून काढण्यासाठी आवश्यक ती सर्व कामे केली जातील, असे सांगितले. हतगड येथील सभेत अजितदादा उपमुख्यमंत्री होतील हि जनतेची आशा खरी ठरली आहे. पुनद धरणाला अर्जुन सागर हे माझ्या वडिलांचे दादासाहेबांचे नाव दिले हे दादांनी दिले आहे. मधील काळात विकास खुंटला होता ती पोकळी भरून काढायची आहे.या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
सुरगाणा तालुक्यातील विकास कामांना गती : उपमुख्यमंत्री अजित पवार