Breaking
देश-विदेश

चिकाडीला चक्रीवादळामुळे घरांचे मोठे नुकसान, ग्रामस्थांची नुकसान भरपाईची मागणी

एकनाथ शिंदे - सुरगाणा प्रतिनिधी

018501

➤ सुरगाणा (नाशिक), ता. ८ ( दिव्य भारत वृत्तसेवा ):- सुरगाणा तालुक्यातील चिकाडी येथे साडेचार वाजेच्या दरम्यान विजाच्या कडकडांसह चक्रीवादळासह पाऊस पडला. चक्री वादळ एवढे जोरात होते की यशवंत भावडू जाधव व शांताराम शिवराम गायकवाड यांच्या घरावरील पत्रे उडल्यामुळे मोठी हानी झाली. पावसाचे घरातपाणी साचले होते. चक्रीवादळाने उडालेल्या पत्रे, कौले यांचा तुकडे होऊन नुकसान झाले आहे. येथील झाडे व लाईटचे सिमेंटचा पोल वाकून घरावरती पडला आहे. त्यामुळे दयाराम डंबाळे, गंगाराम गवळी, अशोक गवळी, जाना वाघमारे, तुकाराम वाघमारे यांच्या घरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तरी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई मिळावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

चिकाडी (ता.सुरगाणा) येथे चक्रीवादळामुळे घरांचे मोठे नुकसान झाडे झाडांची पडझड
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!