





एच. एस. सी. बोर्ड फेब्रु./ मार्च -२०२४ परीक्षा नाशिकरोड केंद्र क्र. ०११५ ची आसनव्यवस्था

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 16 फेब्रुवारी 2024
β⇔ नाशिकरोड, दि.16 (प्रतिनिधी : संजय परमसागर ):- इयत्ता १२ वी एच. एस. सी. बोर्ड परीक्षा फेब्रु./ मार्च २०२४ केंद्र क्र. ०११५ ची आसन व्यवस्था चार उपकेंद्रात विभागण्यात आलेली आहे. विज्ञान शाखेचे सर्व पेपर्स तसेच वाणिज्य शाखा इंग्रजी माध्यमाचे सर्व पेपर आणि मराठी माध्यमाचे इंग्रजी, मराठी, हिंदी, बीके, अकाउंटन्सी आणि अर्थशास्त्र या विषयाचे पेपर्स बिटको महाविद्यालय, नाशिकरोड येथे होतील. वाणिज्य शाखा इंग्रजी विषयाचे आसन क्रमांक S-150033 ते S- 150693 यासह विज्ञान शाखा विषयाचे आसन क्रमांक S009305 ते S- 009466 या आसन क्रमांक ची व्यवस्था बिटको कॉलेज, नाशिकरोड येथे करण्यात आली आहे तर S- 008855 ते S- 009079 या आसनक्रमांकाची व्यवस्था जयरामभाई हायस्कूल, नाशिकरोड येथे करण्यात आली आहे. तर S- 009080 ते S- 009304 या आसन क्रमाकाची व्यवस्था जेडीसी बिटको इंग्लिश मीडियम स्कूल, नाशिकरोड येथे करण्यात आलेली आहे .

आर्टस् शाखेचे मराठी व इंग्रजी माध्यमाचे सर्व पेपर्स तसेच वाणिज्य शाखा मराठी माध्यमाचे ओ.सी.एम.( वाणिज्य संघटन ) एस. पी ( चिटणीसाचा व्यवसाय ), को -ऑप (सहकार ), भूगोल ( वाणिज्य शाखा) या विषयांचे पेपर के जे मेहता कनिष्ठ महाविद्यालय येथे होतील. एच. एस. सी. व्होकेशनल (एम. सी. व्ही. सी. ) चे सर्व पेपर आनंदऋषी विद्यालय, आर्टिलरी सेंटर नाशिकरोड येथे होतील.
तरी संबंधित विद्यार्थ्यांनी आसन व्यवस्थेची नोंद घ्यावी अशी माहिती केंद्र संचालिका सौ. सुनिता नेमाडे यांनी दिली आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510