β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : सायखेडा प्रतिनिधी: राजेंद्र कदम
β⇒ सायखेडा, ता.२८( दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ) :-मविप्र संचलित जनता इंग्लिश व जुनिअर कॉलेज सायखेडा येथे शिक्षक पालक व माता पालक सहविचार सभा संपन्न झाली .कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व सरस्वती पूजनाने करण्यात आली . उपस्थित मान्यवर व पालकमातांचं स्वागत गीत मंचाने स्वागत गीताने केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष विजय कारे हे होते . शिक्षक पालक व माता – पालक सहविचार सभा कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र संचालक शिवाजी गडाख होते . या कार्यक्रमास प्राचार्य नवनाथ निकम उच्च माध्यमिक अध्यक्ष स्वामी कमलाकांत महाराज, पर्यवेक्षक दौलत शिंदे ,शालेय समिती सदस्य नितीन गावले ,वसंत मोगल , अविनाश सुकेनकर ,जगन कुटे,अशपाक शेख मनोज भुतडा ,आहेर सर ,विजय शिंदे, सुधीर शिंदे, सुरेश खैरनार उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवधूत आवर यांनी केले तर प्रास्ताविक श्री टरले सर यांनी केले. यावेळी सर्वानुमते पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी श्याम सोनवणे ,सचिव पदी अशोक टरले ,सहसचिव पदी भगवान कुटे ,विद्यार्थी प्रतिनिधी सिद्धार्थ वरखडे ,यांची निवड करण्यात आली. तर माता-पालक संघाच्या उपाध्यक्षपदी डॉक्टर हाडपे मॅडम, सचिव पदी श्रीमती शिंदे व्ही ए मॅडम सहसचिव पदी प्रियंका हांडगे यांची निवड करण्यात आली. तर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शालेय समिती सदस्य श्री नितीन गावले यांची निवड करण्यात आली. यावेळी गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सी पी एस ओलंपियाड परीक्षेमध्ये विद्यालयास सन्मानपत्र देण्यात आले, मविप्र संचालक शिवाजी आप्पा गडाख यांच्या शुभहस्ते हे प्रमाणपत्र व ट्रॉफी विद्यालयाचे मुख्याध्यापक निकम सर यांनी स्वीकारले. यावेळी माता आणि पालक यांनी विद्यालयात सर्वांगीण विकासासाठी कार्यक्रम राबविण्यात यावे असे सुचवले,तर मविप्र संचालक शिवाजी गडाख यांनी सायखेडा विद्यालय हे नेहमीच विविध कलागुणांमध्ये आघाडीवर असते, असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष करून प्रयत्न केले जातील असे त्यांनी यावेळेस आवर्जून सांगितले .विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती गोसावी मॅडम यांनी विद्यार्थी व पालक यांचा समन्वय असला पाहिजे तरच विद्यार्थ्यांचा विकास होतो व चांगले संस्कार विद्यार्थ्यांना घडवण्यात पालक शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते , असे त्यांनी या वेळेस सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी परिश्रम घेतले.
दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले,मो .८२०८१८०५१०
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
5 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
1 week ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
1 week ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)