महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा
β : नाशिक :⇔कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्राचार्या डॉ . संध्या खेडेकर व्यासपीठावर प्रमुख व्याख्यात्या डॉ. सोनल धांडे , उपप्राचार्या डॉ. निलम बोकील , मैथिली लाखे दिसत आहेत.(प्रतिनिधी:छाया लोखंडे-गिरी)
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनीवार : दि, 9 मार्च 2024
β⇔:नाशिक:दि,9(प्रतिनिधी:छाया लोखंडे-गिरी):-गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एस.एम.आर.के.बी.के.ए.के. महिला महाविद्यालयात आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस सुप्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. सोनल धांडे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या खेडेकर म्हणाल्या, की जगातील जवळपास ५० % लोकसंख्या महिलांची आहे. आजची आधुनिक स्त्री ही उच्चशिक्षित, स्वयंपूर्ण असली तरी काही स्रिया उपेक्षित जीवन जगत आहेत. त्यांना सक्षम बनवणे हे आजचे आव्हान आहे. त्यांनी ह्या वर्षीची महिला दिनाची संकल्पना स्पष्ट केली. सर्व स्तरातील महिलांना सामावून घेऊन पुढे जाण्याचा निर्धार करण्याचे आवाहन केले. ह्या प्रसंगी महाविद्यालयाच्या महिला कर्मचारी राधिका धात्रक, प्रिया बावा, दिवाणे मॅडम , राजश्री पवार,रझिया शेख, सुनिता पगार व अर्चना घुगे ह्यांना सन्मानित करण्यात आले.
β : नाशिक :⇔महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा-[4:44 प्रमुख वक्त्या डॉ. सोनल धांडे ह्यांचा सत्कार करतांना .प्राचार्या डॉ . संध्या खेडेकर , डॉ . निलम बोकील , मैथिली लाखे .(प्रतिनिधी:छाया लोखंडे-गिरी)
डॉ. सोनाली धांडे ह्यांनी कर्करोग समज आणि गैरसमज या विषयावर महिला अध्यापकांशी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या सहाय्याने संवाद साधला. त्यांनी कॅन्सरची भीती बाळगण्यापेक्षा नियमित तपासणी अत्यंत महत्वाची आहे. नियमित पणे केलेल्या तपासणीचे महत्व त्यांनी सांगितले. त्यांनी वेगवेगळ्या तपासण्यांची माहिती दिली. त्यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. कर्करोगावर आधुनिक उपचारांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गीतांजली गीते ह्यांनी केले तर आभार प्रा. छाया लोखंडे ह्यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. निलम बोकील, समन्वयक शोभा त्रिभुवन, मैथिली लाखे तसेच महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षिका मोठया संख्येने उपस्थित होत्या.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. 8208180510
🅱️: येडशी(धाराशिव):⇔येडशी जनता विद्यालय बारावी निकालाची उज्वल परंपरा कायम-(प्रतिनिधी-सुभान शेख)
2 weeks ago
🅱️ : पुणे :⇔ प्रा. डॉ. सोमनाथ वाघमारे यांना ‘झुलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे सीनियर सायंटिस्ट गोल्ड मेडल पुरस्कार प्रदान-(प्रतिनिधी-डॉ. भागवत महाले)
3 weeks ago
🅱️: नाशिकरोड:⇔बिटको महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्सहात संपन्न-(प्रतिनिधी-संजय परमसागर)
3 weeks ago
🅱️:येडशी(धाराशिव):⇔धाराशिव गटविकास अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघनप्रश्नी; श्रीमती.डांगे.पी.एम ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी-(प्रतिनिधी-सुभान शेख)
4 weeks ago
🅱️ : सुरगाणा(नाशिक):⇔”सामुदायिक विवाह हि काळाची गरज”-नरहरी झिरवाळ होय मी आदिवासी विकास मंत्री नव्हे, मात्र आदिवासी आहे, हे निश्चित-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
4 weeks ago
🅱️:सायखेडा(नाशिक):⇔”शिक्षकांनी ज्ञानदानाबरोबर विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य करावे-सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे”-प्रतिनिधी-राजेंद्र कदम)
4 weeks ago
🅱️⇔नाशिक(शहर):⇔”गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित पद्मविभूषण श्री.रतन टाटा स्मृती व्याख्यान संपन्न”-(प्रतिनिधी-छाया लोखंडे)