β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि १७ सप्टेंबर २०२३
β⇒ नाशिकरोड , ता १७ ( प्रतिनिधी : संजय परमसागर ) :- “ओझोन दिनाची आंतरराष्ट्रीय संकल्पना “मॉन्ट्रिअल प्रोटोकॉल” नुसार ओझोन थर निश्चित करून त्याचं संरक्षण करणे आणि हवामान व तापमान बदल कमी करण्यासाठी प्रयत्न करणे हा असून आपण सर्वांनी जागतिक करारामध्ये ओझोन थर विघटनाच्या बाबतीत घातलेल्या अटींचे काटेकोरपणे पालन केले तरच ओझोन थराचे विघटन येणाऱ्या काळात कमी होऊ शकेल अन्यथा पर्यावरणीय विध्वंसला सामोरे जावे लागेल , असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. प्रमोदकुमार हिरे यांनी केले . गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात ओझोन दिनानिमित्त एच.पी. टी. महाविद्यालयाचे भूगोलविभाग प्रमुख डॉ. प्रमोद कुमार हिरे यांचे जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते . यावेळी व्यासपीठावर कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. सुनिता नेमाडे, पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे , श्री. जयंत भाभे , प्रा. लक्ष्मण शेंडगे , सौ. सुरेखा वसईकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले . उपप्राचार्या सुनिता नेमाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले .
प्रमोदकुमार हिरे यांनी रेफ्रिजरेटर , डिओ यांच्या अतिवापरामुळे क्लोरोफ्लोरो कार्बन सीएफसीचे लेयर तयार झालेले आहे. रस्त्यांवर असलेली असंख्य वाहने यामुळे मानवी जीवनावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे जागतिक तापमान वाढत आहे. त्यासाठी शक्य तितके आपण पायी चाललेलं चांगलं , सायकलचा वापर वाढवा , जास्तीत जास्त वृक्षलागवड करा , इलेक्ट्रिकल वाहने वापरा असेही सांगितले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राहुल पाटील यांनी केले तर आभार आप्पासाहेब रायते यांनी मानले . तांत्रिक सहाय्य निलेश वाणी व भूषण कोतकर यांनी केले . कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले: मो ८२०८१८०५१०
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
5 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
1 week ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
1 week ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)