





नाशिक जिल्ह्यातील फोरजी सर्वर डाऊनमुळे दुकानदार व ग्राहक हैराण : धान्य वितरण यंत्रणा ठप्प

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 27 मे 2024
β⇔नाशिक, दि. 27(प्रतिनिधी : सुरेश इंगळे):- राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात, म्हणजेच नाशिक जिल्ह्यात, गेल्या आठ दिवसांपासून धान्य वितरण यंत्रणा करणाऱ्या फोरजी मशीनच्या सर्वर डाऊनमुळे दुकानदार व ग्राहक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एप्रिल 2024 मध्ये सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था सुटसुटीत व्हावी यासाठी प्रत्येक रेशन दुकानदारास पुरवठा विभागाकडून 4G तंत्रज्ञानाने युक्त पॉश मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. बायोमेट्रिक पद्धतीने अंगठ्याचा ठसा स्कॅन करून या यंत्राद्वारे धान्य वितरणाचा लाभ दिला जातो. भविष्यात अंगठ्याचा ठसा स्कॅन न झाल्यास आय स्कॅनर च्या माध्यमातून देखील धान्य वितरण करण्याची सुविधा याच यंत्रावर उपलब्ध होणार आहे. परंतु, गेल्या आठ दिवसांपासून या फोरजी यंत्रांना सर्वर डाऊन चा फटका बसत आहे. वारंवार प्रयत्न करूनही कनेक्टिव्हिटी मिळत नाही, मिळाली तर थंब स्कॅनिंग होत नाही, असे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे ग्राहकांना सारख्या दुकानात चक्रा माराव्या लागत आहेत आणि केवायसी करणाऱ्यांना सुद्धा अडचणी येत आहेत.