बिटको महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी
β : नाशिकरोड :⇒बिटको महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी – ( प्रतिनिधी : संजय परमसागर )
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि. 22 सप्टेंबर 2023
β⇒ नाशिकरोड, ता. 23 ( प्रतिनिधी : संजय परमसागर ) :- गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे , डॉ. विजय सुकटे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला . त्यानंतर आपल्या मार्गदर्शनात डॉ. पठारे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील महाराष्ट्रातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण तज्ञ होते .ते सामायिक शिक्षणाचे पुरस्कर्ते होते, त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कमवा आणि शिका या उपक्रमाची सुरुवात करून त्यांनी अल्पउत्पन्न असलेल्या मुलांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले. कार्यक्रमास डॉ.कृष्णा शहाणे, डॉ.घनश्याम बाविस्कर , डॉ. विलास कांबळे , डॉ. विद्युल्लता हांडे , डॉ.कांचन सनानसे , डॉ.मेहता नागभिडे यासह प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आदी उपस्थित होते .
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ .भागवत महाले, मो . ८२०८१८०५१०
मुख्य संपादक– डॉ. भागवत महाले –दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
5 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
1 week ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
1 week ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)