





➤ सायखेडा , ता. १ ( दिव्य भारत वृत्तसेवा ):- मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आणि अभिनव बाल विकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण विद्यालयाचे प्राचार्य श्री नवनाथ निकम यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाजाचे निफाड तालुका संचालक श्री शिवाजी आप्पा गडाख होते ,ते म्हणाले की महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक परंपरा ऐतिहासिक स्वरूपाची आहे ,आपण या महाराष्ट्र भू वरती जन्माला आलो खरोखरच आपले भाग्य समजतो .कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री नवनाथ निकम यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकात संयुक्त महाराष्ट्राचा लढा याविषयी विद्यार्थ्यांना उदबोधन केले .या कार्यक्रमास सायखेडा ग्रामपंचायत सरपंच श्री गणेश कातकडे ,अभिनव शालेय समितीचे अध्यक्ष जगन्नाथ डेरले शालेय समितीचे सदस्य जगन आप्पा कुटे, निवृत्ती निकम, सोमनाथ डेरले सुदामराव भोज ,अमृता टरले, अशपाक शेख ,संजय शिंदे, राजेंद्र कुटे, दिलीप शिंदे ,भाऊलाल कुटे, उर्मिला गाडे ,शितल खांदवे, उपमुख्याध्यापक रमेश अडसरे अभिनवच्या मुख्याध्यापिका श्रीमती बोरस्ते मॅडम पर्यवेक्षक दौलत शिंदे उपस्थित होते .यावेळी एन. एम .एम. एस. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यी कृष्णा वारघडे व श्रीविद्या सानप यांचा संचालक शिवाजी आप्पा गडाख यांच्या हस्ते करण्यात आला.
पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीत श्री शिरीष बापू गडाख व जगन आप्पा कुटे विजयी झाल्याबद्दल* त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती विभाग प्रमुख श्री अवधूत आवारे यांनी केले तर आभार अशोक टर्ले यांनी मानले या कार्यक्रमास शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी पालक व पंचक्रोशीतील संस्थेचे जेष्ठ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.