





सुरगाणा महाविद्यालयात रेणुका भाऊसाहेब हिरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

β⇔दिव्य भारत बीएस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि. 2 जानेवारी 2024
β⇔बोरगाव ,ता २.( प्रतिनिधी – लक्षण बागुल ) :- महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित सुरगाणा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शनिवारी (दि.30) रेणुका भाऊसाहेब हिरे यांच्या 116 व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.महाविद्यालयीन परिवाराच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य विजय अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले.
भाऊसाहेब हिरे यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्यात रेणुका आजींनी आयुष्यभर खंबीर साथ दिली. कर्मवीरांच्या समाजकार्यात आजींचे फार मोठे योगदान राहिलेले आहे. त्यांनी कर्मवीरांच्या समाजकार्यात स्वतःला वाहून घेतले होते. सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक प्रा. सोमनाथ पावडे यांनी केले.आभार प्रा. सुरेश भोये यांनी मांडले.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
β⇔दिव्य भारत बीएस एम न्यूज वृत्तसेवा :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले मो. ८२०८१८०५१०