





४ जून पर्यंत मान्सून केरळात दाखल होणार !
DIVYABHARATBSMNEWS ,NASHIK, WEDNESDAY MAY,17,2023
राजू भोये : पुणे प्रतिनिधी
——————————————–
पुणे, ता-१७ (दिव्य भारत बी एस एम न्यूज वृतसेवा ) : एल निनोच्या सावटामुळे यंदाच्या मान्सून पावसाविषयी अंदाजित चर्चा सुरू असताना नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) यंदा तीन दिवस उशिराने दाखल होण्याची शक्यता आहे. चार जून रोजी देशाचे प्रवेशद्वार असणाऱ्या केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. या अंदाजानुसार मान्सूनचे आगमन चार दिवस मागे पुढे होण्याची शक्यता आहे . ही गृहीत धरण्यात आल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे .दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता साधारणतः मान्सून साधारणता एक जून पर्यंत केरळमध्ये पोहोचतो यात मान्सूनचे आगमन सात दिवस आधी किंवा उशिराने होऊ शकते गतवर्षी मान्सूनचे आगमन तीन दिवस आधी म्हणजेच २९ मे रोजी झाले होते. यंदा तो तीन दिवस उशिराने केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे. वायव्य भारतातील किमान तापमान दक्षिण द्वीपकल्पावरील पूर्व मोसमी पावसाचे प्रमाण चीनच्या दक्षिण समुद्रातून होणारा किरणोत्सव आग्नेय हिंद महासागरात साधारणतः एक ते दीड किलोमीटर उंचीवर वाहणारे वारे वायव्य प्रशांत महासागरातील समुद्रसपाटीलगतचा हवेचा दाब ईशान्य हिंद महासागर महासागरात साधारणतः दहा किलोमीटर उंडीवर वाहणारे वारे हे सहा घटक हा अंदाज तयार करताना विचारात घेतले जातात. यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या मान्सून हवामानात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ९६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्रज्ञ विभागाने आयएमडी ११ एप्रिल रोजी जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी अधिक पाऊस पडण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे मान्सून हंगामात येणे किती एल निनो किती स्थिती राहण्याची शक्यता असून इंडियन ओशन डाय पोल आयडी धनात्मक पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या अखेरीस मान्सून हवामाना हंगामातील पावसाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज व विभागनिहाय पावसाचे वितरण स्पष्ट होणार आहे.
DIVYABHARATBSMNEWS ,NASHIK, WEDNESDAY MAY,17,2023
“दिव्य भारत बी एस एम न्यूज ” मुख्य संपादक – प्रा. डॉ .भागवत महाले
——————————————————————————————————————–