





स्वयम एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्यात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार संपन्न…
दिव्य भारत बी एस एम न्यूज : प्रतिनिधी नाशिक –संजय परमसागर
नाशिक, ता.७ ( दिव्य भारत बी एस एम न्यूज ):- स्वयम एज्युकेशन ट्रस्ट , नाशिक या संस्थेचा पाहिला वर्धापन दिन मंगळवार, दि. ६ जुन रोजी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त श्री. दत्तात्रय कोतवाल,वय वर्षे ८४ यांसह ज्येष्ठ नागरिक , सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी नेते यांचा सत्कार व दिलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल, समाज सेवा व राष्ट्र सेवा या बद्दल कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त केले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री धोंडोपंत गवळी व सर्व पदाधिकारी उपस्थित होते . संस्थेच्या वर्धापदिनानिमित्त रू.१००००/- चा धनादेश गवळी परिवाराच्या वतीने सुपूर्द करण्यात आला .
दिव्य भारत बी एस एम न्यूज