





त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे “राष्ट्रीय ग्राहक दिन” ऊत्साहात संपन्न

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि 25 डिसेंबर 2024
β⇔त्र्यंबकेश्वर, (नाशिक),ता.25 (प्रतिनिधी: नीता पुणतांबेकर ):- येथील म.वि.प्र.संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथे वाणिज्य विभागातर्फे “राष्ट्रीय ग्राहक दिन” ऊत्साहात संपन्न झाला.यावेळी प्रमुख वक्ते श्री.अमर सोनवणे (जिल्हा ग्राहक पंचायत प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर,) कार्यक्रमास श्रीमती प्रणाली फुल्लुके(पुरवठा निरीक्षण अधिकारी, श्री नरेंद्र बेंडाळे, श्रीमती सुनीता भुतडा, डाॅ.शरद कांबळे, डॉ.भागवत महाले उपस्थित होते .
विद्यार्थ्यांनी कोणतीही खरेदी करतांना जागरूक राहून खरेदी करावी , वस्तूच्या,मालाच्या खरेदीची पावती घ्यावी असे आवाहन केले.ग्राहक हक्क दिनाचे महत्त्व ग्राहक संरक्षण कायदेविषयक पुर्वईतिहास विद्यार्थ्यांना सांगीतला. कार्यक्रमात ग्राहक संरक्षण परिषदेच्या त्र्यंबकेश्वर येथील कार्यकर्त्या श्रीमती सुनीता भुतडा यांनीही ग्राहक संरक्षण कायदेविषयक ग्राहकांना मिळणारे विविध अधिकार समजावून सांगीतले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती प्रणाली फुल्लुके(पुरवठा निरीक्षण अधिकारी) ऊपस्थित होत्या. ग्राहक संरक्षण कायदा हा सर्वसामान्य जनतेसाठी वस्तू आणि सेवांमध्ये येणाऱ्या अडचणी प्रश्नांवर ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आला असे सांगून कायदेविषयक मार्गदर्शन केले.
महाविद्यालाचे प्राचार्य डॉ दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला. ग्राहक दिनानिमित्त निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. पोस्टर स्पर्धाचे परिक्षण म्हणून प्रा डॉ भागवत महाले यांनी केले. कार्यक्रमास डाॅ.शरद कांबळे,डॉ भागवत महाले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख श्रीमती नीता पुणतांबेकर यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती श्वेताली सोनवणे यांनी केले.आभार प्रदर्शन श्रीमती शाश्वती निरभवणे यांनी केले.डॉ वैशाली जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. या कार्यक्रमास वाणिज्य विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510