





प्राथमिक शिक्षक संजय पुंजाराम देवरे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि 01 डिसेंबर 2024
β⇔दिंडोरी (नाशिक), ता.01 (प्रतिनिधी:रावसाहेब जाधव ):- जिल्हा परिषद शाळा तिसगाव येथील प्राथमिक शिक्षक संजय पुंजाराम देवरे यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या भावपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण विस्तार अधिकारी वंदना चव्हाण होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्य सरचिटणीस संजय बबनराव पगार उपस्थित होते.
कार्यक्रमाला केंद्रप्रमुख विजय निकम, प्रमोद भालेराव, शिक्षक परिषद तालुका अध्यक्ष सुभाष बर्डे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष पानडगळे, उपाध्यक्ष प्रवीण घडवजे, ग्रामधिकारी सय्यद एस. एस., तसेच दिंडोरी शिक्षक परिषद कार्यकारी अध्यक्ष नितीन शिंदे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. रावसाहेब जाधव व प्रमोद देवरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि सेवानिवृत्त शिक्षक संजय देवरे यांच्या जीवनकार्याचा परिचय सादर केला.
संजय पगार यांनी आपल्या भाषणात सेवानिवृत्त शिक्षकांनी संघटनेसोबत जोडले राहण्याचे महत्त्व सांगितले, जेणेकरून भविष्यातील अडचणींना सामोरे जाताना मदत होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षा वंदना चव्हाण यांनी संजय देवरे यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि सेवानिवृत्तीनंतरही आनंदी आणि आदर्शवत जीवन जगण्याचा संदेश दिला. कार्यक्रमात संजय पुंजाराम देवरे आणि त्यांच्या पत्नी उज्वला संजय देवरे यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकांचे योगदान :
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका मीना लोहकरे, पदवीधर शिक्षक रावसाहेब जाधव, दीपक वसावे, प्रमोद देवरे, अरुणा जाधव, शुभांगी बागुल, तसेच विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले. उपस्थित मान्यवर व शिक्षक बंधू-भगिनींची साथ मिळाली .
कार्यक्रमात सुरेश भोये, सेवानिवृत्त मुख्याध्यापक तुकाराम राऊत, शरफोद्दीन शेख, आंधळे भाऊ, बाळू पवार, अशोक पवार, सुधाकर नाठे, शांताराम घोलप, सूर्यवंशी सर, गांगुर्डे सर, महेश सोनवणे, शरद बोरसे यांसह खेडगाव केंद्रातील शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे संजय देवरे यांच्या कार्याचे स्मरण करताना उपस्थितांमध्ये उत्साह आणि कौतुकाचे वातावरण पाहायला मिळाले.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510