





मुख्याध्यापक तुकाराम नथु राऊत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिसगाव सेवापूर्ती सोहळा संपन्न

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 1 जून 2024
β⇔दिंडोरी,दि.1 (प्रतिनिधी : रावसाहेब जाधव):-दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा तिसगाव शाळेचे मुख्याध्यापक सत्कारमूर्ती तुकाराम राऊत यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संकल्प लॉन्स वणी येथे उत्साहात संपन्न झाला.
आज सेवापूर्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माजी केंद्रप्रमुख राजेंद्र गांगुर्डे प्रमुख पाहुणे – मधुकर भरसट सरपंच वणी,दत्तू गवारे माजी केंद्रप्रमुख खेडगाव, श्रीमती चंद्रकला बच्छाव मुख्याध्यापिका जनता हायस्कूल तिसगाव, शरफोद्दीन शेख माजी मुख्याध्यापक तिसगाव, नामदेव चौरे सेवानिवृत्त मुख्याध्यापक भातोडे आदि उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा सत्कार करण्यात आला .

सदर कार्यक्रमात मान्यवरांनी तुकाराम राऊत यांनी निस्वार्थपणे केलेली विद्यार्थी सेवा, शाळेचा विकास याबद्दल गुणगान मनोगत व्यक्त समाधान गाडे , शेख सर, श्रीमती चंद्रकला बच्छाव मॅडम, सुरेश गांगुर्डे , प्रवीण सोनवणे , मुलगा चि.तन्मय राऊत व कृष्णा खंबाईत यांनी गुणगान गात मनोगत व्यक्त केले. अखेरीस सत्कारमूर्ती तुकाराम राऊत यांचे मनोगत व अध्यक्षीय भाषण झाले.
त्यानंतर तुकाराम राऊत यांचा वाढदिवस असल्याने पत्नी सुनंदा राऊत, चिरंजीव ईश्वर राऊत (BDS) ,चिरंजीव तन्मय राऊत (MBBS )यांचेसह केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमास शिक्षक संघटना पदाधिकारी अनिल गायकवाड, प्रवीण सोनवणे, बाळू पवार,अशोक पवार, संजय देवरे, समाधान गाडे, चव्हाण सर,श्रीमती ताईबाई आहिरे, भर्तरीनाथ सातपुते, कृष्णा खंबाईत नातेवाईक व शिक्षक वृंद उपस्थित होते.
याप्रसंगी सूत्रसंचालन प्रमोद देवरे, प्रास्ताविक व जीवन परिचय , आभार रावसाहेब जाधव यांनी मांनले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )