





प्रकाश गोसावी यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा नाशिक : शुक्रवार : दि १५ सप्टेंबर २०२३
β⇒ दिंडोरी , ता १५ ( प्रतिनिधी : शाश्वत महाले ) :- येथील जि.प.प्रा.शाळा करंजवण शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश गोसावी सर यांना भारत सरकार मान्यताप्राप्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ संचलित राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांचा राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार सोलापूर प्रदान करण्यात आला . येथील आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा हरिभाई देवकरण मुळे सभागृहात नुकताच पार पडला. प्रकाश गोसावी सर यांचे शैक्षणिक कार्य उत्तम असून समाज सहभागातून पायाभूत सुविधा व भौतिक सुविधा यासाठी प्रयत्नशील असतात. शैक्षणिक गुणवत्तापूर्ण व विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी वर्ष भर ते विविध उपक्रम राबवत असतात. पालक व विद्यार्थी यांच्या साठी व्याख्यानांचे आयोजन करत असतात.
लोकसहभाग शाळेतील गरजू विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देतात. समाजकार्य त्यांना आवड आहे. त्याबद्दल गौरव व सन्मानार्थ प्रकाश गोसावी सर यांना कार्याची दखल घेत पुरस्कृत केले. याप्रसंगी पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष – अभिजित पाटील , सोलापूर माध्यमिक शिक्षणाधिकारी – महारुद्र नाळ साहेब , संयोजक व संघाचे प्रदेशाध्यक्ष – बापूसाहेब आडसूळ, जगदंबा शिक्षण संस्था संस्थापक – कपिल कोरके, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष – संतोष निकम, महासचिव – रमेश देसाई यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्राच्या विविध भागातून शिक्षक व नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते. राज्य स्तरीय मेळाव्यात मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना मुख्याध्यापक संघ जिल्हा सरचिटणीस लालसिंग ठोके सर, जिल्हा कोषाध्यक्ष निंबा दातरे सर,डॉ भागवत महाले , दिंडोरी ता.अध्यक्ष संजीव निकुंभ सर ता. कार्याध्यक्ष दिपक निकम ,ता.कोषाध्यक्ष जिभाऊ नाडेकर सर जिल्हा महिला प्रतिनिधी पुष्पा डावरे मॅडम, ता.कार्यकारिणी सदस्य बापूसाहेब गोसावी सर ,सुरगाणा येथील मुख्याध्यापक सुभाष शिवदे यादिनी सत्कार केला .
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो ८२०८१८०५१०
