





मालेगावात “प्रेरणा दिन” उत्साहात साजरा: फार्मसी महाविद्यालयात राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि 16 डिसेंबर 2024
β⇔ मालेगाव (नाशिक), ता.16 (प्रतिनिधी :डॉ.अमोल शिरोडे ):- मालेगाव: के. बी. एच. एस. एस. ट्रस्ट संचलित फार्मसी महाविद्यालयात “प्रेरणा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. स्वर्गीय डॉ. बळीरामजी हिरे (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून, संस्थेचे अध्यक्ष मा. प्रसाद बळीरामजी हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयात विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कॅरम, वैज्ञानिक प्रश्नमंजुषा, औषधनिर्माणशास्त्र नियतकालिका स्पर्धा, तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय सीईटी परीक्षा यांचा समावेश होता.
कॅरम स्पर्धा : कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांक अन्सारी नबील अहमद मोहम्मद आसिफ आणि मोमीन मोहम्मद खिजार मोहम्मद रिजवान (रॉयल कॉलेज ऑफ फार्मसी, सायने खुर्द, मालेगाव) यांनी मिळवला, तर नुसरत खान सलीम खान सलमानी आणि मोमीन मोबसिर मोहम्मद (आयटी कॉलेज, मालेगाव) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
ज्ञानिक प्रश्नमंजुषा स्पर्धा : वैज्ञानिक प्रश्नमंजुषा स्पर्धेत मयुरी सुनील शेवाळे आणि ऋतुजा भाऊसाहेब पगार (इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. सानिया सदा शकील अहमद आणि इरफान अहमद शकील अहमद (रॉयल कॉलेज ऑफ फार्मसी, मालेगाव) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. औषधनिर्माणशास्त्र नियतकालिका स्पर्धा : डॉ. सर एम. एस. गोसावी कॉलेज ऑफ फार्मसी, नाशिक यांनी औषधनिर्माणशास्त्र नियतकालिका स्पर्धेत प्रथम क्रमांक, के. बी. एच. एस. एस. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, मालेगाव यांनी द्वितीय क्रमांक, तर डेलोनिक्स सोसायटी, बारामती यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
राज्यस्तरीय सीईटी परीक्षा : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित सीईटी परीक्षेत आर्य महेश लहामगे (शताब्दी कॉलेज ऑफ सायन्स, अगसखिंड) यांनी 189 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. इशा कमलाकर शिरसाट (जनता विद्यालय, झोडगे) यांनी 187 गुणांसह द्वितीय क्रमांक, तर मृणाल बाळू पवार (स्वामी विवेकानंद कॉलेज) आणि विशाल बोरसे (समता आर्ट्स अँड सायन्स जूनियर कॉलेज) यांनी 180 गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.
प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन : कार्यक्रमात प्रमुख पाहुणे श्री. प्रशांत दशपुते (ग्लेनमार्क, नाशिक) आणि श्री. मंगेश सूर्यवंशी (प्राचार्य, वर्धमान हायस्कूल) यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष मा. प्रसाद बळीरामजी हिरे यांनीही विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी योगदान : महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद बैरागी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अविनाश गांगुर्डे, डॉ. मोहम्मद इम्रान, डॉ. योगेश अहिरे, डॉ. राजेंद्र दिघे, डॉ. दीपक सोमवंशी यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
“प्रेरणा दिन” कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना ज्ञानवृद्धीची प्रेरणा देऊन त्यांना उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून दिला.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510