





बिटको महाविद्यालयात मुन्शी प्रेमचंद जयंती व विद्यार्थी स्वागत समारंभ उत्साहात संपन्न

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार :: दि. 31 जून 2024
β⇔,नाशिकरोड, दि.31 ( प्रतिनिधी :संजय परमसागर ):- ” मुन्शी प्रेमचंद हिंदी व उर्दू साहित्यातील नावाजलेले कादंबरीकार, विचारवंत लेखक होते. लहानपणापासून त्यांचे जीवन अनेक संघर्षातून गेले. त्यांच्या कथा सर्वसामानांच्या होत्या. सर्वसामान्यांचे जीवन, वंचित आणि शोषित समाजातली दुरावस्था यावर लेखणीतून प्रकाश टाकला. त्यांच्या साहित्याची, कथा लेखणीची जादू आजही वाचकांच्या मनावर कायम आणि अजरामर आहेत. संघर्षातूनच मार्गक्रमण करणाऱ्याचे जीवन अधिक सफल आणि समृद्ध होते, अभ्यासाबरोबरच संवाद कौशल्य आपल्यातील क्षमता विकसित करा, ” असे महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित येवला कॉलेजचे हिंदी विभागप्रमुख डॉ. रवींद्र ठाकरे यांनी मार्गदर्शन करतांना केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात दि. ३१ जुलै रोजी मुन्शी प्रेमचंद जयंती व प्रथम वर्ष हिंदी विभागातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ सेमिनार हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाला . त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यान देतांना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. रवींद्र ठाकरे यांच्यासह कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. के. सी. टकले, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. सुनिता नेमाडे,डॉ. संतोष पगार, डॉ. संदीप तपासे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. संतोष पगार यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. संदीप तपासे यांनी करून दिला. यानंतर एसवायबीए व एम ए हिंदीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी प्रथम वर्ष बीएच्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी मुन्शी यांनी हिंदी साहित्य क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असून विद्यार्थ्यांनी वाचनाची रुची वाढवा. महाविद्यालयातील विविध उपक्रमात सहभागी होऊन नवीन नवीन गोष्टी आत्मसात करा. आपल्यातील कला जोपासा असे सांगितले. उपप्राचार्य डॉ. अनिल कुमार पठारे यांनी आपल्या मनोगतात मुन्शी प्रेमचंद यांचे साहित्या मध्ये मानवतावादी समाज संघर्ष विचारावर पगडा होता. आपली ऊर्जा सकारात्मक कार्यासाठी खर्च करा असे सांगून लहानपणीतील हिंदी साहित्यातील आपले अनुभव कथन केले. शेरोशायरी व कविता सादर केल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. दीपा चौधरी हिने केले तर आभार कु. सरोज कांबळे हिने मानले . कार्यक्रमास प्रा. नरेश पाटील,सौ. मीना शिंदे, संदीप आरोटे, संजय परमसागर, डॉ. सागर चौधरी यासह कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे हिंदी विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि. 29 जून 2024
β⇔,येडशी (धाराशिव) दि.29 ( प्रतिनिधी : सुभान शेख):-
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)
©सदर लेखाबाबत संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. सदर मत सर्वस्वी लेखकाचे असून त्यांचीच जबाबदारी आहे,