





येडशी बसस्थानकावर महिला शौचालयाचा अभाव: प्रवासी महिलांची गैरसोय, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष
β : येडशी (धाराशिव):⇔येडशी बसस्थानकावर महिला शौचालयाचा अभाव: प्रवासी महिलांची गैरसोय, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष-(प्रतिनिधी: सुभान शेख)
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि.11 जानवरी 2025
β⇔येडशी (धाराशिव),ता.11 (प्रतिनिधी: सुभान शेख ):-धाराशिव तालुक्यातील येडशी बसस्थानकावर महिला शौचालयाची सुविधा नसल्याने प्रवासी महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्राप्त माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी एसटी महामंडळाच्या धाराशिव आगाराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील गुत्तेदाराला महिला शौचालय बांधकामाचे कंत्राट दिले होते. सुरुवातीला काम सुरू झाले, परंतु नंतर अर्धवट अवस्थेतच ते थांबवण्यात आले, ज्यामुळे महिलांची मोठी गैरसोय होत आहे.
येडशी बसस्थानकावर दिवस-रात्र हजारो प्रवासी महिलांचा वावर असतो. अनेकदा प्रवासादरम्यान महिलांना शौचालयासाठी थांबावे लागते, पण या परिसरात शौचालयाच्या सुविधेचा अभाव असल्याने महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. महिलांच्या तक्रारी असूनही धाराशिव आगाराचे वरिष्ठ अधिकारी या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे.
काम थांबले, निधी गायब?
ग्रामस्थ आणि प्रवासी महिलांचे म्हणणे आहे की, शौचालयासाठी मंजूर झालेला निधी धाराशिव आगाराच्या अधिकाऱ्यांकडे गेला की गुत्तेदाराच्या खिशात, याबद्दल संशय निर्माण झाला आहे. शौचालयाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्याप एकदाही भेट दिली नाही, हे अत्यंत खेदजनक आहे.
महिलांच्या तक्रारींना दाद मिळणार कधी?
बसस्थानकावर शौचालय नसल्याने प्रवासी महिलांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान महिलांसाठी शौचालयाचा अभाव हा मोठा अडथळा ठरत आहे. या संदर्भात महिलांनी राज्य शासनाला लवकरात लवकर दखल घेण्याची विनंती केली आहे.
महत्वपूर्ण मागणी :
राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून धाराशिव आगाराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बसस्थानकावरील अपूर्ण शौचालयाचे काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत. काम थांबवण्यामागील कारणांचा तपास करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी महिलांसह ग्रामस्थांकडून केली जात आहे.
महिला प्रवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत राहिल्यास आंदोलने उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने त्वरित पावले उचलणे गरजेचे आहे.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )