Breaking
आरोग्य व शिक्षण

बिटको महाविद्यालयात इ.११ वी परिक्षेतील गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न

श्री संजय परमसागर - नाशिकरोड प्रतिनिधी

0 1 2 9 1 1

➤ नाशिकरोड, ता. ५ ( दिव्य भारत वृत्तसेवा ):- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात दि.६ मे रोजी शै. सत्र २०२२-२३ मध्ये झालेल्या इ.११ वी कला, वाणिज्य व विज्ञान तसेच एचएसव्हीसी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी पेढे, गुलाबपुष्प व गुणपत्रिका देऊन सन्मानित केले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ.सुनिता नेमाडे, पर्यवेक्षिका सौ. प्रणाली पाथरे, प्रा. जयंत भाभे,सौ. आर. एस. पाटील, प्रा. योगेश काळे यासह शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, सत्कारार्थी विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते. सत्कारार्थी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी यथोचित मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. गुणवंत विद्यार्थ्यांचा घोषित निकाल प्रथम, द्वितीय व तृतीय अनुक्रमे खालीलप्रमाणे:-

कला शाखा:-

कु. पुर्वा संजय खालकर (५४०/६००)- ९०.००%,

कु. वैदेही विवेकचंद्र सेठ (४३४/६००)- ७२.३३ %

कु. झोया अश्फाक सय्यद (४०६/६००)- ६७.६६ %

वाणिज्य शाखा:-

कु. नुपूर अजबसिंग देवराळे (५४६/६००)- ९१.०० %

कु. जीनल नजीर इलाही (५३४/६००)- ८९.०० %

कु. अस्मिता विनीत गुप्ता ( ५३१/६००) – ८८.५० %

कु. दिव्या सुहास कराडकर ( ५३१/६००) – ८८.५० %

विज्ञान शाखा :

एकलव्य श्याम गोयल (५९०/६००)- ९८.३३ %

श्रीजीता दिनेश पवार (५२१/६००)- ८६.८३ %

कु. मयुरी रवींद्र जाधव (५०१/६००)- ८३.५० %

एच.एस.सी.व्होकेशनल शाखा :-

तुषार जगत पारेख (इएलटी प्रथम) (३५२/६००) – ५८.६०%

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करताना शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करून त्यांच्या मार्गदर्शनामुळे व पालकांच्या सहकार्यामुळेच सुयश प्राप्त झाल्याचे सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!