





➤ नाशिक, ता. ५ ( दिव्य भारत वृत्तसेवा ):- शिबिराचे उद्घाटन गोखले एज्युकेशन सोसायटी चे सेक्रेटरी आणि डायरेक्टर जनरल सर डॉ.एम. एस. गोसावी यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे विभागीय सचिव डॉ.राम कुलकर्णी उपस्थित होते.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मानव संसाधन संचालिका प्राचार्या डॉ.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कस्तुरी इंटिग्रेटेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा हा पहिला उपक्रम असून यापुढेही अशा शिबिरांचे आयोजन विविध गावांमध्ये करण्यात येईल असे डॉ.दीप्ती देशपांडे यांनी सांगितले. प्रमुख अतिथी डॉ.राम कुलकर्णी यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सर्व ग्रामस्थांना या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले.
सर डॉ. एम. एस. गोसावी हे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, गोखले एज्युकेशन सोसायटी ही कायम सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था आहे. ज्ञानप्रसारासोबत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक उत्तरदायित्व भावना अशा उपक्रमांमधून निर्माण होते. स्वत:चे शारीरिक ,मानसिक आणि भावनिक आरोग्य जपताना ग्रामीण भागातील आपल्या बांधवांचे आरोग्य जपणेही तितकेच महत्वाचे आहे. आरोग्य शिबिरांद्वारे ग्रामीण भागात आरोग्यविषयक जागृती घडेल आणि येणाऱ्या पिढ्या निरामय जीवन जगतील.डॉ.प्रदीप जायभवे आणि उपसरपंच श्री.भास्कर राव थोरात यांनी आपल्या मनोगतात गोखले एज्युकेशन सोसायटी आणि एस. एम. आर. के. कॉलेज बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी सरपंच सौ. जानका बाई चव्हाण, उपसरपंच श्री. भास्कर राव थोरात ,आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप जायभावे,डॉ.गौरी भोई,डॉ.खंडेलवाल, डॉ.ज्योती दुबे,डॉ.लीना भट डॉ.नीलम बोकील ,डॉ.अनंत बावा ,डॉ.सूर्यवंशी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनएसएस अधिकारी डॉ . गीता यादव यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ.कविता पाटील यांनी मानले .