





➤ सायखेडा , ता. ६ ( दिव्य भारत वृत्तसेवा ):- मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सायखेडा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची स्मृतिशताब्दी साजरी करण्यात आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शालेय समितीचे अध्यक्ष श्री विजू नाना कारे व प्राचार्य श्री नवनाथ निकम यांच्या हस्ते करण्यात आले .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष विजयनाना कारे होते यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना कारे म्हणाले की राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य अनमोल असून आजच्या विद्यार्थ्यांनी त्याची प्रेरणा घेऊन समाजामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री नवनाथ निकम यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याविषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमास शालेय समितीचे अध्यक्ष विजुनाना कारे ,प्राचार्य श्री नवनाथ निकम, नितीन गावले, भाऊसाहेब सुकेनकर, छगन भाऊ कोरडे ,नाना गाडे, संतोष सुकेनकर, अश्फाक शेख ,उपमुख्याध्यापक श्री रमेश अडसरे, पर्यवेक्षक श्री दौलत शिंदे ,अभिनवच्या मुख्याध्यापिका श्रीमती बोरस्ते मॅडम उपस्थित होते. यावेळी इयत्ता पाचवी ते नववी व अकरावीच्या या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गुणपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले .
यावेळी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पात्र विद्यार्थी संचिता कांडेकर, आदित्य गवई, समीक्षा खालकर ,अबोली सुकेनकर, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी आर्यन वलटे या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . याप्रसंगी संचिता खांडेकर श्रुतिका डेरले या विद्यार्थ्यांनी तर राजेंद्र कदम या शिक्षकांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा परिचय करून दिला .त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना आपल्या वर्गात वार्षिक निकालाचे वाटप करण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री अवधूत आवारे यांनी केले तर आभार अशोक टरले यांनी मानले .या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी ,शिक्षकेतर बंधू भगिनी, पालक ,विद्यार्थी ,संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.