Breaking
राजकिय

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रसची एकहाती सत्ता

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रसची एकहाती सत्ता ! कॉंग्रसला पुन्हा उभारी ...

018516

दिव्य भारत बी.एस.एम.न्यूज –  खास प्रतिनिधी  बेंगळूरू

 बेंगळूरू (बंगलोर)  ( दिव्य भारत बी.एस.एम.न्यूज ) ता.१३  :- दक्षिणीय भारतात राजकीय सत्ता टिकवण्यात भाजपची हार झाली असून  पुन्हा कॉंग्रस सत्तेत विराजमान होवून उत्तेजन मिळाले आहे.  अतिशय संघर्षमय  निवडणुकीच्या  लढ्यात  कर्नाटकात काँग्रेसचे अद्भुत यश संपादन केले आहे . कार्यकर्त्यात  आनंदोत्सव साजरा केला जात आहे . मात्र आता  भाजपसाठी दक्षिणोद्वार बंद  झाले असून  मुख्यमंत्रीपदी सिद्धरामया की शिवकुमार कर्नाटक विधानसभेसाठी शनिवारी झालेल्या मतमोजणी मध्ये २२४ पैकी १३६ जागांवर विजय मिळवत काँग्रेसने निर्विवाद बहुमत मिळवले आहे. त्यामुळे दक्षिणेचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे एक महत्त्वाचे राज्य भाजपला गमवावे लागले आहे . तब्बल दहा वर्षांनी काँग्रेसला कर्नाटकच्या जनतेने पुन्हा एकदा संपूर्ण सत्ता बहाल केली. 

                    आता मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. महिनाभर प्रचाराचा  धुराळा उडवल्यानंतर दहा मे रोजी एकाच टप्प्यात कर्नाटक विधानसभेसाठी मतदान झाले. त्यानंतर  शनिवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली तेव्हापासूनच काँग्रेसने आघाडी घेतली होती आणि ती शेवटपर्यंत टिकवली.  २०१८  साली जिंकलेल्या जागांपैकी तब्बल ५६ जागा जास्तंची जिंकून  काँग्रेसने दमदार कामगिरी कामगिरी केली आहे. तर सत्ताधारी भाजपने ३९ जागा गमावल्या असून त्यांना अवघ्या ६५ जागांवर विजय मिळवला मिळविण्यात आला आहे.बोम्मई सरकारमधील तब्बल १५ मंत्री ही पराभव झाले आहेत . धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या जागांमध्ये १८ ने घट झाली असून कुमारस्वामी यांच्या पक्षाला केवळ एकोणावीस जागांवर समाधान मानावे लागले आहे. या दिग्विजयानंतर देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे .

           काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘नफरत का बाजार बंद’ ‘मोहब्बत की दुकाने’ सुरू अशा शब्दात आपला आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अभिनंदन करतानाच निवडणुकीमध्ये झोकून देऊन काम केलेल्या भाजप काँग्रेस कार्यकर्त्यांची आभार मानले आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पराभव मान्य केला असून त्यामागील कारणांवर विचार मंथन केले जाईल, असे म्हटले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण प्रभावानंतर काँग्रेसला प्रथमच एका मोठ्या राज्यात एवढा प्रचंड विजय मिळवला आहे. देशभरातील निवडणुकांमध्ये सातत्याने आकसत चाललेल्या सर्वात जुन्या पक्षाला मोक्याच्या क्षणी उभारी दिली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये वर्षाअखेर होऊन घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ताकदवान भाजपची दोन हात करताना कर्नाटकचा विजय उत्तेजना देणारा ठरेल. पुढील वर्षी होऊ घातलेल्या  लोकसभा निवडणुकीवरही हा निकाल परिणाम करणारा ठरू शकेल,असे चित्र राज्यकर्त्यांना वाट आहे. निवडणूक  निकाल चित्र : कॉंग्रेस पक्ष – १३६ ,भाजप पक्ष -६५ , जेडीएस -१९ इतर – ४ असे एकूण २२४ जागासाठी निवडणूक संपन्न झाली . 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!