इंग्रजी शाळा महासंघाचे सोमवारी १५ मे रोजी पुण्यात आंदोलन
पुणे, ता. १५ ( दिव्य भारत बी एस एम न्यूज) : इंग्रजी शाळा संस्थाचालकांच्या अनेक मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत, यासाठी राज्यातील विविध इंग्रजी शाळा संघटना वेळोवेळी आंदोलने करत आहे. सोमवार १५ मे रोजी दुपारी 12:00 वाजता शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक कार्यालय सेंट्रल इमारत समोर पुणे येथे महाराष्ट्र इंग्रजी शाळा महासंघाचे निदर्शने आंदोलन होत आहे. हे आंदोलन महाराष्ट्र इंग्लिश स्कूल स्ट्रस्टीज असोसिएशन ( स्वतंत्र ) सोलापूर संघटनेचे प्रदेश अध्यक्ष हरिष शिंदे इंग्लिश मिडियम स्कूल असोसिएशन ( साताराचे ) अध्यक्ष डॉ . मनिंद्र कारंडे इंग्लिश मिडियम स्कूल संघटना (नाशिकचे) संस्थापक अध्यक्ष डॉ . प्रसाद सोनवणे ; मेसा इंग्रजी शाळा संघटना ( छत्रपती संभाजी नगर ) संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद शिंदे , मेस्कोचे संस्थापक अध्यक्ष गजानन वाळके ( जालना ) कला – क्रीडा शिक्षक महासंघ ( मुंबई ) प्रदेश उपाध्यक्ष राजेश निंबेकर, आरटीई फाउंडेशनचे ( नागपूर ) संस्थापक अध्यक्ष प्रा . सचिन काळबांडे यांच्या नेतृत्वाखाली केवळ प्रमुख पदाधिकारी शासनाचे लक्ष वेधिसाठी आंदोलन करीत आहे . हळूहळू हे आंदोलन आधिक होत जाणार असल्याचे मेसाचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद शिंदे व राज्य सरचिटणीस रत्नाकर फाळके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे . त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ह्या मागण्या केलेल्या आहेत :
1)RTE 25% प्रवेशीत विद्यार्थ्यांची तीन वर्षाची थकीत प्रतीपूर्तीची रक्कम 100% आदा करा.
२) विना टीसी . प्रवेश देण्याबाबतचे पारिपत्रक रद्द करा.
3) वर्षा अखेर शाळेची फिस थकित असलेल्या पालकांच्या पाल्यांचा प्रवेश रद्द करण्याचे शासनस्तरावरून पत्र निर्गमित करावे
4) मान्यताप्राप्त शाळांना जोडूनच पूर्व प्राथमिक चे वर्ग असावे विना शासनमान्य चालविणारे प्रि . प्रायमरी तात्काळ बंद करावे.
5) RTE 25% अंतर्गत मोफत शिक्षण इयत्ता 12 वी पर्यंत करावे.
6 ) एकाच कॅम्पसमध्ये भरणाऱ्या प्राथमिक शाळेतील RTE 25% अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांना माध्यमिक शाळेत वर्ग करण्याचा आधिकार. स्थानिक शिक्षणाधिकारी यांना द्यावा.
.7) शाळा संरक्षण कायदा लागू करा.
8 ) 10 वी12 वी यांना तीन वर्ष मंडळ मान्यता मिळालेल्या शाळांना कायम मंडळ मान्यता घ्यावी .
9) शाळा भरत असलेल्या ( भाडयाची किंवा स्वतःची ) इमारतीस विज बिलात तसेच मालमत्ता करात 50% सवलत द्यावी व त्यामध्ये सामन्य कर , स्वच्छता , शिक्षण कर लागू करू नये .
10) इंग्रजी शाळांना लोकप्रतिनिधींचा निधी वापरता यावा अनुदानित शाळेप्रमाणे इंग्रजी शाळांना क्रीडा विभागाच्या योजनेचा लाभ मिळावा.
आदी प्रमुख मागणीसाठी आंदोलन होत आहे . सदर आंदोलनात महाराष्ट्र इंग्लिश स्कूल स्ट्रस्टीज असोसिएशन – डॉ . प्रासाद सोनवणे ( नाशिक ), हरिष शिंदे ( सोलापूर ) डॉ .मनिंद्र कारंडे ( सातारा ) रमेश बिरादार ( लातूर) प्रल्हाद शिंदे , रत्नाकर फाळके ( छत्रपती संभाजी नगर ) गजानन वाळके ( जालना ) प्रा . सचिन काळबांडे ( नागपूर ) नंदराज पवार ( कोल्हापूर )यांनी
महाराष्ट्र इंग्रजी शाळा महासंघ यांच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे .
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा