





लोकशाही वाचविण्याचे खरे काम पत्रकारांच्या माध्यमातून होतंय – गुरव
व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने विविध मान्यवरांचा सन्मान
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि. 7 जानेवारी 2025
β⇔येडशी,(धाराशिव ),ता.7(प्रतिनिधी : सुभान शेख):- आपल्या देशात लोकशाही व्यवस्था असून या व्यवस्थेमध्ये सर्व नागरिकांना समान अधिकार आहेत. शासन देखील प्रत्येक घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करते. मात्र अनेक वेळा खरे लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. ते खरे लाभार्थी कोण याची माहिती पत्रकारांच्या माध्यमातून शासन दरबारी होत असते. विशेष म्हणजे लोकशाही व्यवस्थित काहीजण मनमानी करीत असतील तर ते देखील जनतेच्या निदर्शनास आणून देण्याचे काम पत्रकारच करतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकशाही वाचविण्याचे काम पत्रकारांच्या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन शिवसेना (ठाकरे) चे धाराशिव शहर प्रमुख सोमनाथ गुरव यांनी दि.६ जानेवारी रोजी केले.
आद्य पत्रकार तथा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना गुरव म्हणाले की, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कृषी व राजकीय आदींसह इतर कोणतेही प्रश्न जनता दरबारी मांडण्याचे काम निर्भीड व निपक्षपातीपणे केवळ पत्रकारच करीत आले व करीत आहेत. यामध्ये पूर्वी प्रिंट मीडिया होती. तर आता प्रिंट मीडिया बरोबरच सोशल मीडिया देखील मोठ्या प्रमाणात गल्ली ते दिल्ली पर्यंत वाढले असल्यामुळे याची प्रचिती अनेकांना येत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच धाराशिव शहरातील रस्ता, स्वच्छता, लाईट, सुरळीत पाणी पुरवठा, वैद्यकीय सुविधा व महामार्ग लगत सर्विस रस्ता आदींसह इतर प्रश्न देखील या पत्रकारांच्या माध्यमातूनच लोकप्रतिनिधीच्या निदर्शनास आणून देण्याचे काम केले जाते. त्यामुळेच लोकप्रतिनिधी ते प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी फोटो जर्नालिस्ट कालिदास म्हेत्रे, सेवानिवृत्त शिक्षक सय्यद विखर अहमद रहीम काझी यांचा पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांनी तर सूत्रसंचालन विशाल जगदाळे यांनी व उपस्थितांचे आभार महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे यांनी मानले. यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते, जिल्हा कार्याध्यक्ष राजेश बिराजदार, डिजिटल मीडिया विंगचे जिल्हाध्यक्ष जुबेर शेख, शैक्षणिक विंगचे जिल्हाध्यक्ष शितल वाघमारे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सलीम पठाण, जिल्हा कार्यवाहक कुंदन शिंदे, साप्ताहिकचे जिल्हा उपाध्यक्ष जफर शेख, किरण कांबळे, मुस्तफा पठाण, अल्ताफ शेख, शहबाज शेख, प्रशांत मते, प्रशांत सोनटक्के, शितल वाघमारे, सुबान शेख, राजकुमार गंगावणे, राम थोरात, अभिजीत ओहाळ, अहमद अन्सारी, ज्योतीराम निमसे, किशोर माळी आदी उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )