





➤ नाशिक, ता. १९ ( दिव्य भारत वृत्तसेवा ):- गोखले एज्युकेशन सोसायटी द्वारे आयोजित ‘नवीन शैक्षणिक धोरण -२०२०’ ह्या चर्चासत्राच्या चौथ्या भागात प्रा. डॉ. विजय काळे ह्यांचे व्याख्यान ‘ ट्वेंटी स्टेपस टू इंम्प्लिमेंटेशन ऑफ एन. इ.पी. – २०२०’ ह्या विषयावर संपन्न झाले. त्यांनी आता पर्यंत राबवलेल्या विविध शैक्षणिक धोरणांचा आढावा घेतला. पाश्चात्य आणि पौर्वात्य विचारवंतानी शिक्षणाच्या केलेल्या व्याख्या स्पष्ट केल्या. नवीन शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये स्पष्ट केली.
प्राचार्या डॉ. अंजली कुलकर्णी व प्राचार्या डॉ. संध्या खेडेकर ह्यांनी नवीन शैक्षणिक धोरणांबाबत मार्गदर्शन केले.अध्यापकांसाठी कृति सत्र आयोजित केले होते. सहभागी प्राध्यापकांनी नवीन शैक्षणिक धोरणा प्रमाणे स्वतःच्या विषयाचे उद्दीष्ट व साध्य निश्चित केले .समापन सत्रात अध्यक्ष स्थानी संस्थेचे सचिव व महासंचालक सर डॉ. मो. स गोसावी होते. तसेचसन्माननीय अतिथी व संस्थेच्या एच. आर. डायरेक्टर डॉ. सौ दीप्ती देशपांडे याप्रसंगी उपस्थित होत्या.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे डॉ. मीना चंदावरकर, स्टाफ ट्रेनिं संस्था अँकेडमीच्या समन्वयक डॉ. अंजली कुलकर्णी, परिषदेच्या निमंत्रक प्राचार्या संध्या खेडेकर , संस्थेच्या उपाध्यक्षा व मुंबई विभागीय सचिव डॉ. सुहासिनी संत उपस्थित होते .डॉ. सुहासिनी संत ह्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्राचार्या डॉ. संध्या खेडेकर ह्यांनी परिषदेचा वृत्तांत सादर केला. प्रा. गायकवाड व प्रा. सायखेडकर प्रा. दीपक पाटील ह्यांनी सहभागी प्राध्यापकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले .आपल्या मनोगतात अध्यापकांनी संशोधनाला महत्व दिले पाहिजे असे सांगितले. शिक्षक बनण्याची संधी आपल्याला मिळाली आहे , त्याचे सोने करा असे त्या म्हणाल्या. वाणी , विचार, व्यवहार ह्यातील निर्मळता जपण्याचा सल्ला त्यांनी शिक्षकांना दिला.अध्यक्षीय भाषणात सर डॉ. मो. स. गोसावी म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरणाकडे आशावादी व आनंदादायी शिक्षण बनविण्यावाच्या दृष्टीकोनातून आपण पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले. शिक्षकाचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी असे उपक्रम खूप फायद्याचे ठरतात असे ते म्हणाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मुग्धा जोशी व डॉ. स्नेहा रत्नपारखी ह्यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. प्रणव रत्नपारखी ह्यांनी केले. या दोन दिवसीय चर्चासत्राला महाराष्ट्रातील विविध महाविद्या लयातील प्राचार्य , उपप्राचार्य, प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वितेसाठी विविध समित्यांचे सहकार्य लाभले .