





महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून तपासणी बरोबर मोफत शस्त्रक्रिया देखील केल्या जातील – डॉ. भारती पवार

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 13 फेब्रुवारी 2024
β⇔ नाशिक, दि.13 (प्रतिनिधी : नरेंद्र आहेर):- ग्रामीण रूग्णालय दिंडोरी येथे आयोजित वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी डॉ. भारती पवार यांनी बोलतांना सांगितले की आता केंद्र सरकारने देखील सर्व राज्यांना आरोग्य शिबिरांसाठी निधी दिलेला आहे अशा प्रकारच्या महाआरोग्य शिबिरातून रुग्णांची तपासणी आणि शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जातात. अंधत्वाचं प्रमाण वाढू नये म्हणून मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील या शिबिराद्वारे केल्या जाणार आहेत.
माझी एवढीच विनंती आहे, की आपण सुद्धा याचा जनजागर करा ज्यांना अडचणी असतील त्यांनी रुग्णालयाशी संपर्क साधा असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.या यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव,श्याम मुरकुटे, श्याम बोडके,रणजित देशमुख, योगेश बर्डे, सुनील पवार ,अमर राजे ,दीपक जाधव, अरुणाताई देशमुख, नरेंद्र जाधव, महेंद्र पारख ,तुषार वाघमारे, डॉ राजेंद्र वराडे,वसंत कावळे, किशोर ढगे, मित्रानंद जाधव, अमोल खोडे, कुंदन जावरे, निलेश खोडे, मयूर जैन तसेच प्रांत शिंदे साहेब,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ समीर काळे, बीडीओ जगताप मॅडम, डॉ. सुभाष मांडगे, डॉ अनंत पवार आदींसह नागरिक उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510