





➤ नाशिकरोड , ता. १२ ( दिव्य भारत वृत्तसेवा ):-” भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली शिकवण, विचार, मूल्यं, तत्वे अमलात आणुन त्यांना प्रिय असणारी समता ,स्वातंत्र्य व बंधुत्व ही लोकशाहीची तत्व तसेच मानवी हक्कांचे संरक्षण व संवर्धन करण्याचा निर्धार करून वाचनाचा अंगीकार करा ,”असे प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी केले .
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंती महाविद्यालयातील ग्रंथालयात उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी , उपप्राचार्य डॉ अनिलकुमार पाठारे , डॉ. आकाश ठाकूर ,उपप्राचार्या सौ. सुनिता नेमाडे , पर्यवेक्षिका सौ प्रणाली पाथरे यांनी प्रतिमापूजन करून अभिवादन केले. यानंतर सामुदायिक बुद्धवंदना म्हणण्यात आली. याप्रसंगी डॉ. घनश्याम बाविस्कर यांनी विचार व्यक्त करताना युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा देऊन त्यांच्या शिक्षण, न्यायव्यवस्था ,कायदा ,संघराज्य रचना, स्रीयांचे प्रश्न, कामगाराचे अधिकार अशा विविध क्षेत्रातील घटनेतील क्रांतिकारक निर्णयांबाबत माहिती दिली. त्यानंतर उपप्राचार्य डॉ अनिलकुमार पठारे , डॉ. के.एम. लोखंडे यांनीही विचार व्यक्त केले . कार्यक्रमास पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे, डॉ. शशिकांत साबळे , डॉ. सुदेश घोडेराव , डॉ. कैलास बोरसे , विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष प्रा. लक्ष्मण शेंडगे , ग्रंथपाल एस.व्ही. चंद्रात्रे, डॉ. अश्विनी घनबहादुर, डॉ.सुधाकर बोरसे, डॉ. घनश्याम बाविस्कर, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. विशाल माने , स्टाफ सेक्रेटरी प्रा.विजय सुकटे , डॉ. विलास कांबळे , डॉ. विशाल माने , प्रा. गणेश दिलवाले , डॉ.संभाजी शिंदे , प्रा. दिनेश बोबडे , प्रा. कविता खरे , कविता कटारे , कुलसचिव राजेश लोखंडे, कार्यालय अधीक्षक मुकुंद सोनवणे, आकाश लव्हाळे , विठ्ठल शृंगारे , अविनाश कांबळे ,अनिल गोरे ,.कुणाल डास यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आदी उपस्थित होते. डॉ. उत्तम करमाळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले . विद्यार्थी विशाल शेजवळ यांने मी ‘ डॉ. भिमराव रामजी आंबेडकर बोलतोय ‘ हे आत्मनिवेदन सादर केले .