





➤ नाशिक, ता. १७ ( दिव्य भारत वृत्तसेवा ):- गोखले एज्युकेशन सोसायटी द्वारे नवीन शैक्षणिक धोरणावर दोन दिवसीय चर्चासत्र आयोजित केले होते, त्यात बोलताना सरांनी वरील उद्गार काढले. ते म्हणाले ह्या साठी शिक्षकाने जीवनभर विद्यार्थी वृत्ती जपली पाहिजे. ते पुढे म्हणाले नवे शैक्षणिक धोरण, त्याचे स्वरूप , तत्व समजून घेतली पाहिजेत. आधीच्या शैक्षणिक धोरणाशी त्याचा तौलनिक अभ्यास केला पाहिजे . नवीन शैक्षणिक धोरणाचे स्वरुप व त्याचे प्रत्यक्ष कार्यान्वयन ह्या बद्दल अनुभवी शिक्षण तज्ज्ञ ह्या दोन दिवसाच्या चर्चासत्रात मार्गदर्शन करण्यात आले श्री महेश दाबक , अहमदनगर कॉलेजचे प्रा. विजय काळे , सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे डीन प्रा. पराग काळकर यांनीनवीन शैक्षणिक धोरणाबद्दल चर्चा केली. ह्या प्रसंगी व्यासपीठावर श्री महेश दाबक , स्टाफ ट्रेनिंग अँकेडमी च्या समन्वयक डॉ. अंजली कुलकर्णी , चर्चासत्राच्या निमंत्रक डॉ. संध्या खेडेकर उपस्थित होते.
कार्यक्रमांचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत संस्थेच्या एच. आर. डायरेक्टर व एस. एम.आर. के. महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे ह्यांनी केले. चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ख्याती प्राप्त शिक्षणतज्ज्ञ सर डॉ. मो. स. गोसावी होते .
(कार्यक्रमांचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत संस्थेच्या एच. आर. डायरेक्टर व एस. एम.आर. के. महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे ह्यांनी केले.)
ह्या प्रसंगी ‘कॉन्फरन्स प्रोसिडिंग्स ‘व ‘कोसायको’ ह्या एच. ए. एल. कॉलेजचे मॅगझीनचे व प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले .उद्घाटन सत्रात बोलताना मुख्य अतिथी डॉ मीना चंदावरकर ह्यांनी कोरोना महासाथीच्या काळात शिक्षण क्षेत्रा समोर नव्याने उभी राहिलेली आव्हाने , त्यानुसारच . करावे लागलेले बदल ह्यांचा उहापोह घेतला. नव्या शैक्षणिक धोरणातील ऑन लाईन शिक्षणाचे महत्व ही स्पष्ट केले. नवे शैक्षणिक धोरण यशस्वी करण्यासाठी शिक्षकांनी त्याच्याशी पूर्णपणे एकरूप होणे आवश्यक आहे .नव्या शैक्षणिक धोरणाचे मुख्य वैशिष्ट्य हे आहे की भारतीय हस्त व्यवसाय, वस्तु , खाद्य पदार्थ , कला ह्यांचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये केले पाहिजेत. ह्या दोन दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे शिक्षकांनी आपले विचार, कृती ह्या अधिक तेजस्वी होतील असे पाहिले पाहिजे.आपल्या अध्यक्षीय भाषणात सर डॉ. मो. स. गोसावी ह्यांनी कामाच्या दर्जाला अत्यंत महत्वाचे मानले पाहिजे असे सांगितले . त्यासाठी आपण आजीवन विद्यार्थी असले पाहिजे. शिक्षकांसाठी व्यवस्थापनाचे शिक्षण आवश्यक आहे त्यांनी सांगितले.उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. मुग्धा जोशी व डॉ. स्नेहा रत्नपारखी ह्यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. अंजली कुलकर्णी ह्यांनी केले.
कार्यक्रमाला संस्थेचे नाशिक विभागाचे सचिव डॉ. राम कुलकर्णी , मुंबई विभागीय सचिव डॉ सुहासिनी संत, पदाधिकारी , संस्थेच्या विविध महाविद्यालयांचे प्राचार्य , उपप्राचार्य , प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उद्घाटनानंतर ‘ सिग्निफिंकस अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ एन इ पी ‘ ह्या पहिल्या चर्चासत्राचे प्रमुख वक्ते राष्ट्रीय नीती आयोगाच्या शैक्षणिक धोरणाच्पा कार्यान्वयन समित्ती चे सचिव श्री. महेश दाबक होते . विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी हे अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ अमृतकर ह्यांनी श्री दाबक ह्यांचा परिचय करून दिला. श्री दाबक ह्यांनी सांगितले की ह्या धोरणाद्वारे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य मिळणार आहे. तसेच तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आता अपरिहार्य झाले आहे. आर्टिफिशीयल इंटेलिजन्सचा वाढता प्रभाव पाहता मानवाला मशिनच्या पेक्षा अधिक गतीने पुढे जाणे आवश्यक आहे , असे मत त्यांनी व्यक्त केले. संशोधनाला आता अधिक महत्व आहे असे ते म्हणाले. सत्राचा समारोप करताना सत्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी ह्यांनी सांगितले की नव्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे उद्योग व शिक्षण क्षेत्राची सांगड घालणे आवश्यक आहे. त्यांनी ग्रामीण भागात हे धोरण राबवताना येणाऱ्या अडचणींचा उहापोह घेतला. प्राचार्य अमृतकर ह्यांनी आभार व्यक्त केले.
द्वितीय सत्रात मल्टी डिसीप्लीनरी एज्युकेशन: एन. इ.पी. इम्प्लिमेंटेशन २०२० ‘ ह्या विषयावर डॉ पराग काळकर ह्यांचे व्याख्यान झाले. ह्या सत्राच्या समन्वयक डॉ. कविता पाटील होत्या. सत्राच्या अध्यक्ष स्थानी डॉ. सुनीता पिंपळे होत्या. तृतीय सत्रात ‘ एन. इ.पी. २०२० अँड इम्लिमेंटेशन इन इंडिया ‘ ह्या विषयावर डॉ. मीना चंदावरकर ह्यांचे व्याख्यान झाले. ह्या सत्राचे समन्वयन डॉ. प्रणव रत्नपारखी ह्यांनी केले. अध्यक्षस्थानी संस्थेच्या एच. आर. डायरेक्टर प्राचार्या डॉ सौ दीप्ती देशपांडे होत्या.