





➤ नाशिकरोड , ता.१२ ( दिव्य भारत वृत्तसेवा ):- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात नाशिकरोड येथील संस्था ६० व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने दि. १० एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान हिरकोत्सव वार्षिक स्नेहसंमेलन व विविध डेज साजरे करण्यात आले , अशी माहिती प्राचार्या डॉ मंजुषा कुलकर्णी यांनी दिली.
सदर महोत्सवात दि. १० एप्रिल रोजी रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, यासह चॉकलेट व मिसमॅच डे तर दि. ११ एप्रिल रोजी मेहंदी स्पर्धा, निबंध स्पर्धा व वन मिनिट शो यासह टाय व सारी डे तर दि. १२ एप्रिल रोजी गीतगायन व नृत्य स्पर्धा यासह कॅप डे साजरा करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून प्रोत्साहन व व्यक्तिमत्व विकास व्हावा या दृष्टीने जडणघडणीसाठी आवश्यक कार्यक्रम, स्नेहसंमेलन व डेजचे आयोजन होत असल्याची माहिती प्राचार्या डॉ मंजुषा कुलकर्णी यांनी दिली. स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष सहा. प्रा. लक्ष्मण शेंडगे , जयंत भाभे सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.सुधाकर बोरसे, सांस्कृतिक राजदूत डॉ. शशिकांत साबळे , विद्यार्थी विकास अधिकारी डॉ विशाल माने, सर्व उपप्राचार्य, सर्व स्पर्धा प्रमुख,उप प्रमुख, सर्व सदस्य, विभागप्रमुख सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आदीसह विशेष प्रयत्नशील केले.