





सायखेडा विद्यालयात ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत……...
पहिल्याच दिवशी मुलांना मिळाली पुस्तके…….
दिव्य भारत बीएस एम न्यूज : प्रतिनिधी निफाड – राजेंद्र कदम
निफाड ता .१५ ( दिव्य भारत बीएस एम न्यूज ):- सायखेडा येथील जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सायखेडा येथे विद्यार्थी प्रवेशोत्सव ढोल-ताशांच्या गजरात मुलांचे औक्षण करून उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री एन के निकम यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उच्च माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष स्वामी कमलाकांताचार्य महाराज होते माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष विजय कारे या कार्यक्रमास सरपंच गणेश कातकाडे ,शालेय समिती सदस्य नितीन गावले ,राजेंद्र कुटे ,वसंत मोगल ,निवृत्ती निकम, भाऊसाहेब सुकेनकर ,दत्तात्रेय कोरडे, दिलीप शिंदे ,भास्कर गायखे, रामभाऊ खालकर ,रतन कांडेकर, अविनाश सुकेनकर ,मनोज भुतडा, पर्यवेक्षक श्री दौलत शिंदे उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाब पुष्प मान्यवरांच्या हस्ते देऊन स्वागत करण्यात आले विज्ञान कक्षाचे उद्घाटन नितीन गावले यांच्या हस्ते करण्यात आले .विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. शालेय पोषण आहाराच्या अंतर्गत मिष्ठान्न भोजन देण्यात आले .आकर्षक वर्ग सजावट करण्यात आली . यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक कमिटीचे प्रमुख श्री अवधूत आवारे यांनी केले व आभार श्री अशोक टरले यांनी मानले. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील पालक-शिक्षक प्रेमी, शिक्षक- बंधू-भगिनी , कार्यालयीन कर्मचारी साद नाद ढोल पथका तील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिव्य भारत बीएस एम न्यूज: मुख्य संपादक –डॉ भागवत महाले