





➤ नाशिकरोड , ता. १२ ( दिव्य भारत वृत्तसेवा ):- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२३ ‘ हिरकोत्सव ‘ उत्साहात साजरा करण्यात आला . यात विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करीत गीतगायन व नृत्य स्पर्धा मध्ये एकूण ५० विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सादर केले . प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ मंजुषा कुलकर्णी यांनी श्रीफळ वाढवून दिपप्रज्वलन करून तसेच नटराज्याचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन केले . याप्रसंगी गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी हे कार्यक्रमास उपस्थित होते व त्यांनी सर्व स्पर्धक व उपस्थित यांना मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ अनिलकुमार पठारे , समन्वयक डॉ. के. सी. टकले , डॉ.आकाश ठाकूर , विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष लक्ष्मण शेंडगे , जयंत भाभे , विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विशाल माने ,सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ शशिकांत साबळे , डॉ. सुधाकर बोरसे , संजय परमसागर , डॉ. कृष्णा शहाणे , डॉ. मीनाक्षी राठी ,सुहास माळवे , डॉ. विजय सुकटे , डॉ. सुभाष भोसले , क्रीडा विभाग संचालक धनंजय बर्वे , महेश थेटे , प्रा. नरेश पाटील , रजिस्ट्रार श्री राजेश लोखंडे , यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी प्रयत्न केले . यावेळी विद्यार्थ्यांची अभूतपूर्व उपस्थिती होती . याप्रसंगी सौ. सोनाली कुलकर्णी- वर्मा , अनुराग रत्नपारखी व राज मुंढे ,डॉ . कांचन सनानसे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.उत्तम करमाळकर यांनी केले . स्पर्धेची सांगता राष्ट्रगीताने झाली .