मणिपूर व सातारा येथे झालेल्या महिला अत्याचाराविरोधात श्रमजीवी संघटनेच निषेध आंदोलन.
β⇒दिव्य भारत बी.एस.एम.न्यूज वृत्तसेवा : सुरगाणा प्रतिनिधी : एकनाथ शिंदे
β ⇒सुरगाणा, ता . २४ (दिव्य भारत बी.एस.एम.न्यूज वृत्तसेवा ):- आज श्रमजीवी संघटनेच्या वतीने देशभरात महिलांवर विशेषता अनुसूचित जमाती जमातीच्या महिलांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत सुरगाणा तहसील कार्यालयाजवळ श्रमजीवी संघटनेने निषेध आंदोलन केले. सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यातील सोनवडी बु. या गावात आदिम कातकरी जमातीतील जेरबंद अमानुष अत्याचार करण्याचा प्रकार श्रमजीवी संघटनेने उघड आणला. येथील तक्रारदार महिलेसह अनेक महिलेला येथील भांडवलदार मालकांन त्याच्या पाच साथीदारासह बलात्कार करून प्रताडीत केले होते. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या महिलेला वाचवून त्यांना पोलिसापर्यंत पोहोचवले आणि कायदेशीर कारवाई करून संबंधित नराधमाला तुरुंगात टाकले.
मात्र या महिलेसारख्या असंख्या महिला उपजीविकेसाठी आपल्या कुटुंबासह स्थलांतरित होतात. याच काळात त्यांच्यावर असे अमानवी पाशवी अत्याचार केले जातात. ही घटना उघडकीस आली असली तरी असे अनेक घटना घडतात. सरकार मात्र याबाबत असे अत्याचार कमी होणे ऐवजी वाढत आहे हे दुर्दैवी आहे.
आज आंदोलन करून आम्ही मणिपूर अत्याचार साताऱ्यातील अमाणूष या देशभर महिलांवर होणाऱ्या अत्याचारचा निषेध नोंदवत आहोत. अशाच पद्धतीने देशात महिलावरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. याच काळात मणिपूर मधील दोन महिलांना नग्न करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करत एक झुंड निघाली. असल्याचा व्हिडिओ जेव्हा काल देशभरात प्रसारित झाला या घटनेवर सर्वच थरारून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. महिलांवर अत्याचार करणारे कुणीही निषेधात्मक अशा घटना कुठेही आणि कुणीही करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली पहिजे. म्हणून असा सर्व घटनांना श्रमजीवी संघटनेने आंदोलनाने येऊन निषेध केला.
दिव्य भारत बी.एस.एम.न्यूज :मुख्य संपादक: डॉ भागवत महाले,मो .८२०८१८०५१०
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
2 weeks ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
2 weeks ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
2 weeks ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)